
पंचवटी । प्रतिनिधी | Panchavati
दसरा (Dussehra) गेला आनंदात, दिवाळी (diwali) झाली मात्र रस्ते घरातील कचर्याने (garbage) फुलली आहेत.
पंचवटीतील (panchavati) विविध भागातील चौका चौकात निरीक्षण केले असता अक्षरशा सर्वत्र कचरा आणि कचरा असून त्या कचर्यावर उपजीविका भागवण्यासाठी जनावरांनी गर्दी केली आहे. नागरिकांबरोबरच पाळीव प्राण्यांचे (domestic animals) व मोकाट प्राण्यांचे आरोग्य (health) धोक्यात आले आहे.
दसरा आनंद देऊन गेला, दिवाळी आली, नातेवाईक मंडळींनी घरे भरली. परंतु नातेवाईक मंडळी येणार, दिवाळी (diwali) आनंदात साजरी करणार म्हणून घर व अंगणातील कचरा (garbage) काढून रस्त्यावर आणून टाकला. त्यामुळे रस्ते कचर्याने गेले आहेत. रस्त्यावर टाकलेल्या कचर्यातून दुर्गंधी पसरली आहे. जनावरांनी मात्र कचर्यावर गर्दी केली आहे.
'स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक' असे म्हणत असताना या कचर्यामुळे झालेल्या रस्त्यांकडे पाहून अतिशय दुःख होत आहे, असेही रहिवाशी, ज्येष्ठ नागरिक एकमेकांशी बोलताना दिसत आहेत पंचवटीतील हिरावाडी, लामखडे मळा, तारवालानगर, दिंडोरी रोड, निमानी बस स्थानक या ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसत आहे. महापालिकेने रस्त्यावरील कचरा भरण्यासाठी व्यवस्था करावी व सर्व रस्ते स्वच्छ आणि सुंदर होतील, अशी व्यवस्था करावी.