तोतया आमदाराला नाशिकमधून अटक

तोतया आमदाराला नाशिकमधून अटक

नाशिक | प्रातिनिधी

विधानसभा उपाध्यक्ष व दिंडोरी पेठचे आमदार नरहरी झिरवाळ (MLA Narhari Zirwal) आणि निफाडचे माजी आमदार अनिल कदम (Shivsena Ex MLA Anil Kadam) यांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या तोतया लोकप्रतिनिधीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी चार दिवसांची पोलीस कोठडी या संशयितास ठोठावण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.... (SP Sachin Patil)

तोतया आमदाराला नाशिकमधून अटक
देशदूतचा ५२ वा वर्धापन दिन : नाशिकचे ऑटोमोबाईल क्षेत्र, काल आज आणि उद्या

अधिक माहिती अशी की, संशयित राहुल दिलीपराव आहेर, वय ३२ वर्षे रा. शिंदवड ता. दिंडोरी जि. नाशिक हा त्याच्या सिल्वर रंगाच्या इनोव्हा गाडी क्रमांक एमएच १५ डीएम४१७५ वर पुढील व मागील बाजुस काचेवर गोल आकाराचा हिरव्या व सिल्वर रंगाचा सत्यमेव जयते व अशोकस्तंभ राजमुद्रा असलेला लोगोचे स्टीकर लावत स्वत:ला मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगत होता.

असे सांगून तो भूलथापा देत लोकांना लुबाडत असल्याच्या तक्रारी ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. यानंतर ग्रामीण पोलिसांनी २९ ऑगस्ट रोजी गुप्त माहितीच्या आधारे त्यास शिंदवड त्रीफुली इथे शिताफीने ताब्यात घेतले.

यावेळी संशयित आहेर याच्या गाडीला शासकीय वाहन भासविण्यासाठी तसेच विधानसभा उपाध्यक्ष आणि आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नावाचे कोरे नोटपॅड राजमुद्रा असलेले व खाली सही असलेले पत्रके मिळून आली.

तोतया आमदाराला नाशिकमधून अटक
देशदूतचा ५२ वा वर्धापन दिन : नाशिकचे बांधकाम क्षेत्र काल आज आणि उद्या

तसेच माजी आमदार अनिल कदम यांचे विधानसभा सदस्यांचे ओळखपत्र त्यांचा फोटो असलेले व स्वत:चे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय प्रवेश पत्रिका तयार करून त्याचा गैरवापर करून त्याचे मंत्र्यांशी जवळीक असल्याचे भासवुन तसेच स्वत: लोकसेवकांच्या विवक्षीत वर्गापैकी नसतांना आपण त्या वर्गापैकी आहोत असे भासवत होता.

अशा चिन्हाचा वापर करून आमदार व माजी आमदार यांची कागदपत्र तसेच साक्षीदार लोकांचे शाळा अनुदानित करतो अशा भुलथापा देवून त्यांच्याकडून रोख रक्कम रूपये १ लाख ५० हजार स्वीकारत खोटे कागदपत्र बाळगत वाहन व कागदपत्रासह मिळुन आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तोतया आमदाराला नाशिकमधून अटक
देशदूतचा ५२ वा वर्धापन दिन : नाशिकचे सहकार क्षेत्र काल आज आणि उद्या

त्याच्या विरोधात वणी पोलीस स्टेशनला (Vani Police Station) भादविसं कलम १७१, १७१ अ, ४२०, ४६८, ४६९ सह राजमुद्रा प्रति कायदा कलम ७ प्रमाणे दिनांक २९/०८/२०२१ रोजी १५:३७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या गुन्हयात राहुल दिलीपराव आहेर वय ३२ वर्षे रा. शिंदवड ता. दिंडोरी जि.नाशिक यांना अटक करण्यात आलेली आहे व त्यांना दिनांक ०३ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपुत हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com