चंद्रदर्शन झाल्याने पवित्र रमजान पर्व सुरू

उद्या पासून पहिला रोजा
चंद्रदर्शन झाल्याने पवित्र रमजान पर्व सुरू
मध्यवर्ती जहांगीर मशिद मध्ये रमजानची तयारी करण्यात आली आहे, नवीन चटाई तसेच पीओपीचे काम झाले आहे.

जुने नाशिक | प्रतिनिधी Old Nashik

इस्लामी शाबान महिन्याची आज 29 तारीख होती. म्हणून आज पवित्र रमजानुल मुबारक महिन्याचे चंद्रदर्शनाची शक्यता होती, तर सायंकाळी 7.15 वाजेच्या दरम्यान पवित्र रमजान ( Ramjan )महिन्याचे चंद्रदर्शन झाल्याने पवित्र रमजानुल मुबारक महिन्याची सुरूवात करण्यात आली. तर उद्या (दि.3) पहिला रोजा ( Roja )राहणार आहे. अशी माहिती खतीब ए नाशिक हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी दिली.

रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील मशिदीमध्ये विशेष सजावट करण्यात आली आहे. शहरातील जहांगीर मशिदीमध्ये आकर्षक पीओपीचे काम झाले आहे तर चटाई देखील नवीन टाकण्यात आली आहे.

इस्लामी नवीन दिवसाची सुरूवात सायंकाळी मागरीची नमाज पासून होते. म्हणून आज सायंकाळपासून रमजान महिना सुरू झाला आहे. तर रमजानची विशेष तरावीची नमाज देखील रात्रीपासून सुरू होणार आहे. नाशिक चांद कमिटीची ( Nashik Chand Committee ) विशेष बैठक शाही मशिदीत होऊन नाशिक व परिसरातील माहिती घेऊन निर्णय घेण्यात आला. त्याच प्रमाणे मुंबई येथील कमिटीने देखील असाच निर्णय घेतला आहे.

प्रत्येक मुस्लिम बांधव पवित्र रमजानुल मुबारक महिन्याची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. आज मगरीबची नमाज नंतर घरातील गच्ची, टॅरेस व उंचीच्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी चंद्र पाहण्यासाठी गर्दी केली होती. दर्शन झाल्यावर मुस्लिम बांधवांनी विशेष दुवा पठण करीत एकमेकांना शुभेच्छा दिल्या, त्याचप्रमाणे लहानांनी मोठ्यांना सलाम करून आशीर्वाद घेतले तर एकमेकांना फोन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील शुभेच्छा देण्यात आल्या.

पवित्र रमजान महिन्याची तयारी जवळपासून पुर्ण झाली आहे. मुस्लिम बहुल भागात विशेष बाजार भरण्यात सुरूवात देखील झाली आहे. धार्मीकस्थळांवर विद्युत रोषणाई करुन सजावट करण्यात आली आहे. बाजारात खजुरचे अनेक प्रकार उपलब्ध झाले असून सुत्तर फेणी, शेवाई आदी पदार्थची दुकाने लागली आहे. यंदा कडा्नयाच्या उन्हात रमजान महिना येत असल्याने त्या प्रमाणे तयारी झाली आहे.

दूध ८० रुपये लिटर

पवित्र रमजानुल मुबारक महिन्याची सुरुवात होणार हे ठरलेले होते. म्हणून येथील बाजार पेठेत दुपारनंतर रोजा ठेवण्यासाठी लागणार्‍या खाद्यपदार्थ खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे रोज 60 ते 70 रुपये प्रती लिटरप्रमाणे विक्री होणार्‍या दुधाचे ( Milk ) भाव थेट 80 ते 90 रुपये लिटर करण्यात आले होते. यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली. शिरमल नान, खजूर तसेच फळे खरेदीसाठी दुकानांवर गर्दी झाली होती.

१४ तासांच्या रोजा

यंदा अत्यंत कडाक्याच्या उन्हात पवित्र रमजान -उल -मुबारक महिन्याची सुरुवात झाली आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव लहान-मोठे महिला पुरुष तसेच सात वर्षावरील बालके देखील रोजा ठेवतात. पहाटे पाच वाजेपासून सायंकाळी सुमारे सात वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या खाण्यापिण्यात बंदी असते. यंदाचे रोजे 14 तासांचे राहणार आहे. पहिला रोजाची सुरुवात पहाटे पाच वाजेच्या सुमारास होणार आहे तर त्याचे इफ्तार सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान होणार आहे. तरी भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.