बेमुदत संपामुळे महसूल विभागाची कामे ठप्प

बेमुदत संपामुळे महसूल विभागाची कामे ठप्प

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी महसूल विभागाच्या (Department of Revenue) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या

बेमुदत संपामुळे (Indefinite strike) कामे ठप्प झाल्याचे चित्र मंगळवारी (दि.१४) संपूर्ण जिल्ह्यात दिसून आले. याचा फटका कामानिमित्त कार्यालयात आलेल्या अभ्यागताना बसला.दि. १ नोव्हेंबर २००५ नंतर राज्य सरकारच्या सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू नाही.

त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान (financial loss) होते आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची देखील वाताहात होते आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी कर्मचाऱ्यांच्या संघटना अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. परंतु सत्तेवर येणाऱ्या कोणत्याही सरकारने कर्मचाऱ्यांची मागणी गांभीर्याने घेतली नाही.

त्यामुळे संघटना आक्रमक झाल्या असून मंगळवारपासून बेमुदत संप (Indefinite strike) सुरू करण्यात आला आहे. या संपामुळे जिल्ह्यातील तलाठी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या सर्वच महसूल कार्यालयांमधील वर्ग तीन व वर्ग चारचे कर्मचारी संपात सहभागी झाले. यामुळे या सर्वच कार्यालयांमध्ये दिवसभर शुकशुकाट दिसून आला. नायब तहसीलदारांसह जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतचे अधिकारीच आपल्या दालनात बसून होते.

परिणामी कर्मचारी उपस्थित नसल्याने कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांना मात्र कामे होत नसल्याने हात हलवित माघारी वे लागले. अधिकाऱ्यांनीच उघडले दालन या संपामध्ये महसूल विभागाचे (Department of Revenue) सर्वच कर्मचारी सहभागी झाल्यामुळे अधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयाचे दालन स्वतःच उघडावे लागले. अधिकारी वर्गाने दिवसभर बसून जेवढे शक्य आहे तेवढे कामकाज केले. आपले दालनही कार्यालयीन वेळ संपल्यानंतर कुलूप बंद केले.

सर्वच शाखांमध्ये कामकाज ठप्प

संपाचा परिणाम जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच शाखांमध्ये पहावयास मिळाला. सामान्य प्रशासन शाखा, महसूल शाखा, टंचाई शाखा, गृह शाखा, पुरवठा विभाग, निवडणूक शाखा, खनिकर्म विभाग, ग्रामपंचायत शाखेसह सर्वच शाखांमध्ये शुकशुकाट होता. याशिवाय तहसील कार्यालयांमध्ये देखील याच शाखांशी संबंधित कामकाज चालते. त्यामुळे तेथील कामकाजही ठप्प झाले.परिणामी विविध दाखले काढणे, तलाठी कार्यालयात सातबारा उताऱ्यापासून शेतीशी संबंधित अन्य नोंदी घेणे, पिकांचे पंचनामे व तत्सम सर्वच कामे यामुळे ठप्प झाले आहेत.

  • एकूण अधिकारी कर्मचारी - १२४१

  • संपामध्ये सहभागी कर्मचारी - १०७१

  • रजेवर असणारे कर्मचारी - ३६

  • कर्तव्यावर हजर अधिकारी - १३४

  • कर्तव्यावर हजर कर्मचारी - ०५

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com