
सटाणा । प्रतिनिधी | Satana
शहराला लाभलेली पूनद पाणीपुरवठा योजना (Punad water supply scheme), पूर्व भागाकडून मंजूर झालेला वळणरस्ता (बायपास) आणि नार-पार प्रकल्पाच्या (Nar-par project) सर्वेक्षणासाठी (Survey) केंद्र शासनाकडून (Central Government) मिळालेली मंजूरी या कामांचे श्रेय माझे एकट्याचे नसून
सर्वपक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शहर-तालुक्यातील व्यापारी, नागरिक व महिलांचे असल्याचे माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खा. डॉ. सुभाष भामरे (Former Union Minister of State for Defense Dr. Subhash Bhamre) यांनी स्पष्ट केले.
सटाणा (satana) शहरातील विविध शेतकरी सोसायट्या (Farmers' Societies), व्यापारी असोसिएशन (Merchant Association), नागरिक व सर्वपक्षीय पदाधिकार्यांच्या वतीने देवमामलेदार यशवंतराव महाराज (Devmamaledar Yashwantrao Maharaj) मंदिर प्रांगणात खा.डॉ. भामरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड होते. खा. डॉ. भामरे पुढे म्हणाले, शहरात पिण्याच्या पाण्याची वणवण होती.
पिण्याचा पाण्याचा प्रश्न (drinking water issue) कायमस्वरूपी संपला पाहिजे. या दृष्टिकोनातून शासनस्तरावर सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला. व्यापारी व नागरिकांच्या शिष्टमंडळांनी लोकप्रतिनीधींकडे पाणीप्रश्नी अनेक सूचना नोंदविल्या. महिलांनी पाण्यासाठी मोर्चे काढले. राजकीय पदाधिकार्यांनी रास्ता रोको आंदोलने (agitation) छेडली. त्याचीच दखल शासनदरबारी घेतली गेली.
आपण केद्रात संरक्षण राज्यमंत्री (Minister of State for Defense) झालो. आपले दायीत्व पणाला लावून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister Devendra Fadnavis) यांच्याकडून 55 कोटींचा निधी (fund) पूनद पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर करून घेतला. हे माझ्या एकट्याचे श्रेय नसून त्याचे वाटेकरी जनताच असल्याचे खा.डॉ. भामरे यांनी स्पष्ट केले.
शहरातून जाणार्या विंचूर-प्रकाशा महामार्गावर वाहतूक (Transportation) वाढली आहे. या मार्गावर शाळा (schools) असल्याने विद्यार्थ्यांना (students) जीव मुठीत घेऊन शाळेत जावे लागते. शाळेत गेलेला मुलगा घरी परत येईल, याची खात्री पालकांना नसते. वाहतुकीमुळे या मार्गावर निरापराधांचे प्राण गेले आहेत. बायपास व्हावा यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी आंदोलने छेडलीत. व्यापारी व नागरिकांनी आंदोलनात उतरून बायपासच्या मागणीचा जोर अधिक तीव्र केला. शासनस्तरावर देखील स्थानिक लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न झालेत.
केंद्र शासनाने (central government) याची दखल घेऊन शहराच्या पूर्व भागाकडून वळण रस्त्याच्या कामाचे सर्वेेक्षण केले आणि केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Union Road Transport Minister Nitin Gadkari) यांच्याकडून आपण सातत्याने पाठपुरावा करीत निधी मंजूर करून घेतला. हे श्रेय देखील माझ्या एकट्याचे नसून बायपासची मागणी करणार्या सर्वपक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शहरातील नागरीक व व्यापार्यांचे असल्याचे स्पष्टीकरण खा. डॉ. भामरे यांनी दिले. यावेळी शहरातील विंचूर-प्रकाशा महामार्गावरील अपघातात मृत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
बागलाण व सुरगाणा तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पडणारे पावसाचे पाणी नद्यांद्वारे गुजरात राज्यात वाहुन जाते. आपले पाणी रोखण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाच्या माध्यमातून नार-पार योजनेसाठी जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून सर्वेक्षणासाठी निधी मंजूर झाला आहे. याचे श्रेय माझे नसून नार-पार प्रकल्पाच्या मागणीसाठी खर्या अर्थाने आंदोलने करणार्या शेतकर्यांचेच असल्याचे खा. डॉ. भामरे यांनी सांगितले.
यावेळी भाजप नेते डॉ. शेषराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव, शहराध्यक्ष राहुल सोनवणे, शिवसेना शहराध्यक्ष जयप्रकाश सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, कॉग्रेस शहराध्यक्ष किशोर कदम, ज.ल. पाटील यांचीही समयोचित भाषणे झालीत. कार्यक्रमास माजी कृउबा सभापती रमेश देवरे, झिप्रू सोनवणे, केशव मांडवडे, श्रीधर कोठावदे, भाजप तालुकाध्यक्ष संजय देवरे, माजी तालुकाध्यक्ष संजय भामरे, सुरेश सोनवणे, मनसेचे सरचिटणीस मंगेश भामरे,नामपूर कृउबा सभापती कृष्णा भामरे, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, माजी उपनगराध्यक्ष दीपक पाकळे,
माजी नगरसेवक साहेबराव सोनवणे, छोटू सोनवणे, नितीन सोनवणे, रामूतात्या सोनवणे, राजेंद्र सोनवणे, दगा सोनवणे, नीलेश पाकळे, शिवाजी सोनवणे, सरपंच परिषदेचे अध्यक्ष संदीप पवार, मुन्ना शेख, महेश देवरे, दिनकर सोनवणे, मंगेश खैरनार,अनिल पाकळे, लक्ष्मण मांडवडे, नागू पाकळे आदीसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, सरपंच, देवस्थानचे ट्रस्टी, शेतकरी, व्यापारी, सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.