Nashik News: मिरवणूक मार्गावर खड्ड्यात ट्रक फसला

Nashik News: मिरवणूक मार्गावर खड्ड्यात ट्रक फसला

नाशिक रोड | प्रतिनिधी

महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे येथील मुक्ती धाम समोर असलेल्या रस्त्यावर सिमेंटचा मोठा ट्रक फसल्याने ईद-ए- मिलादच्या मिरवणुकीत काही वेळ अडथळा निर्माण झाला होता.महापालिकेच्या वतीने परिसरातील खड्डे वरच्यावर बुजविण्यात आल्याचा प्रकार घडला अद्यापही खड्ड्याची परिस्थिती जैसे थे आहे.

महापालिकेचे काही अधिकारी याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नाशिक रोड परिसरातील बिटको चौक ते महात्मा गांधी पुतळा दरम्यान अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले असताना याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

बिटको चौक तसेच मुक्तिधाम चौक समोरील रस्ता व दुर्गा उद्यान समोरील स्टार मॉल या ठिकाणी भले मोठे खड्डे पडलेले असताना सुद्धा गेल्या अनेक दिवसापासून याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे या संदर्भात नागरिकांनी तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान आज ईद-ए-मिलाद निमित्त मिरवणूक काढण्यात आली असता मुक्तिधाम समोरील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात एम एच 15 बी जे 2613 या क्रमांकाचा सिमेंटचा ट्रक खड्ड्यात फसला त्यामुळे मिरवणुकीत काही काळ अडथळा निर्माण झाला होता.

दरम्यान या ठिकाणी बंदोबस्ताला असलेले शहर वाहतुकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर कदम हवालदार तांबे तसेच बेनके महिला पोलीस कर्मचारी सोनालिका गोसावी यांनी तातडीने वाहतूक सुरळीत केली व ट्रक खड्ड्यातून काढण्यासाठी क्रेनला पाचारण केले. तब्बल दोन तासानंतर सदरचा ट्रक खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली.

महापालिकेच्या चुकीच्या नियोजनामुळे सदरचा ट्रक खड्ड्यात फसला परिसरातील खड्डे बुजविण्यात यावे म्हणून अनेक वेळा मागणी करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

अ‍ॅड. नितीन पंडित- महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर संघटक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com