सुन झालं रानसार पावसा विना...
भात आवणी

सुन झालं रानसार पावसा विना...

पावसाअभावी भात आवणी खोळंबली

नाशिक | Nashik

गेल्या आठ दहा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने त्र्यंबक तालुक्यातील (Trimbak Taluka) काही भागात भात आवणीचे (Paddy Crops) कामे खोळंबली आहेत.

भात आवणी
मॉन्सून गेला कुठे ? केव्हा पुनरागमन होणार ?

त्र्यंबक तालुक्यात प्रमुख पीक असलेल्या भात पिकाची लागवड (Paady Cultivation) मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदाही मशागत केल्यानंतर भाताची लागवड करण्यात आली. परंतु पावसाच्या माहेर घरात पाऊसच गायब झाल्याने दुबार पेरणीचे संकट (Double sowing) निर्माण झाले आहे.

दरम्यान सध्या भाताची रोपे (Rice Crops) तयार झाली असून पावसाअभावी भात लावणीची कामे थांबलेली आहेत. ज्या शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था (Water Management) आहे. त्यांनी पाणी भरून भात लावणी करण्यावर भर दिला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील हिरडी (Hirdi) रोहिले, माळेगाव आदी परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतीची कामे रखडली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातुर (Farmers Distrub) झाला असून, भात लावणी करण्यासाठी आवणांत चिखल नसल्याने शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षेत आहे. परिसरातील भात, वरई, नागलीची रोपे उन्हांच्या तडाख्यामूळे करपू लागली आहेत. उन्हांमुळे भात पिके पिवळी पडून संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

पावसाची लपाछपी

गेल्या दहा पंधरा दिवसात अगदी तुरळक प्रमाणात पाऊस पडला असून भात लावणी साठी जोरदार पाऊस आवश्यक असतो. भात पिकाला अधिक पाण्याची आवश्यकता असते. परंतु यंदा हे चित्र बदलल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com