मोबाईल नेटवर्क अभावी नुकसान

मोबाईल नेटवर्क अभावी नुकसान

देसराणे । वार्ताहर Desarane-Kalwan

कळवण (Kalwan) तालुक्यासह पुनद खोर्‍यात मोबाईलच्या नेटवर्क (Mobile Network) चा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यात अनेक नेटवर्क कंपन्यांचे टावर असून सुद्धा नेटवर्कची कमतरता भासत आहे.

विविध ठिकाणी मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सेवा (Internet Service) विस्कळीत झाली असून कासव गतीने सुरू आहे. तर अनेक ठिकाणी नेटवर्कचा पत्ताच नाही.याचा परिणाम दैनंदिन जीवनात झाला आहे. मोबाईल नेटवर्कच्या कमतरतेमुळे लोकांची महत्वाची कामे होत नाही.

महत्वाचे म्हणजे विध्यार्थ्याचे (Students) ऑनलाइन शिक्षण (Online Teaching) चालू आहे परंतु अश्या नेटवर्कच्या वारंवार जाण्याने अभ्यासात व्यत्यय येत आहे. या मोबाईल नेटवर्क चे काही तरी करा असा संताप देखील नागरिकांकडून होत आहे.

लोक वेगवेगळ्या नेटवर्क कंपन्यांचे मोबाईल टॉकटाइम, इंटरनेटचे महागडे रिचार्ज करत असून नेटवर्कच्या कमतरतेमुळे त्याचा वापर होत नसल्याने लोकांची नेटवर्क कंपन्यांकडून लूट होत असल्याचे सूर नागरिकांमधून उमटताना दिसत आहे. अनेकजण खाजगी मोबाईल कंपन्यांचे इंटरनेट वापरतात त्यामुळे याबाबत दाद कोणाकडे मागावी हा प्रश्न पडतो.

परंतु सध्या ठिकठिकाणी मोबाईल टॉवर (Mobile Tower) बसविण्यात आले आहेत तरी देखील नेटवर्क सेवा मुबलक मिळत नाही. या समस्येमुळे तालुक्यातील नागरिक पूर्णता हैराण झाले आहे. या संदर्भात प्रशासनाने लक्ष घालून नेटवर्क कंपन्यांकडे संपर्क साधून सामान्य नागरिकांचा त्रास दूर करावा अशी मागणी पुनद खोर्‍यातील देसराणे येथील युवकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com