नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेला पंधराव्या वित्त आयोगातर्गत केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या निधी खर्चाबाबत राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून अद्यापही मार्गदर्शन प्राप्त झालेले नाही.

निधी खर्चाबाबत मार्गदर्शन न मिळाल्याने प्राप्त झालेला तब्बल 16 कोटी 40 लाखांचा निधी पडून आहे. गत महिन्यात अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या नेतृत्वखालील शिष्टमंडळाने ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेटही घेतली आहे.

केंद्र सरकारकडून 15 व्या वित्त आयोगातंर्गत प्राप्त झालेला तब्बल 16 कोटी 40 लाखांचा निधी दोन महिन्यांपासून अखर्चित आहे.हा निधी खर्चाबाबत राज्य शासनाकडून अपेक्षित मार्गदर्शन मिळत नसल्याने, हा निधी अखर्चितआहे. याबाबत जि.प. च्या ग्रामपंचायत विभागाने शासनाकडे पत्र देऊन मार्गदर्शन मागविले.

मात्र , त्यावर शासनाकडून कोणतेही मार्गदर्शन प्राप्त झाले नाही. यातच सदस्यांकडून निधी खर्चाबाबत अध्यक्ष क्षीरसागर यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत होता. पदाधिकार्यांकडूनही निधी खर्चासदंर्भात सतत विचारणा होत होती.

जि.प.अध्यक्ष क्षीरसागर यांनी गेल्या महिन्यात मंत्रालयात ग्रामसविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना साकडे घातले. याशिवाय कृषीमंत्री दादा भुसे, पालकमंत्री छगन भुजबळ यांचीही भेट घेतली होती.

ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्याशी झालेल्या चर्चेत, यंदा जिल्हा परिषदेला विकासकामांसाठी निधी प्राप्त झालेला नाही. 15 व्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त झाला परंतू, निधी खर्चाचेमार्गदर्शन प्राप्त झालेले नसल्याने निधी पडून असल्याची बाब अध्यक्ष क्षीरसागर यांनी निर्देशनास आणून दिले होते.

ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी 15 व्या वित्त आयोगातंर्गत निधी खचर्बाबत लवकरच मार्गदर्शन पाठविले जाईल असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन देऊन 15 दिवसांचा कालावधी उलटला आहे.मात्र, अद्यापही शासनाकडून मार्गदर्शन मिळालेले नाही. हे मार्गदर्शन लवकर मिळावे, अशी मागणी सदस्यांकडून होत आहे.