सावधान! ओले कपडे गॅसवर वाळवताय? आधी 'ही' बातमी वाचा

सावधान! ओले कपडे गॅसवर वाळवताय? आधी 'ही' बातमी वाचा

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

पावसात (Rain) भिजल्यामुळे कपडे ओले झाल्याने ते गॅसवर (Gas) वाळवत असताना कपड्यांनी अचानक पेट घेतल्याचा प्रकार सावतानगर (Savatanagar) परिसरात घडला आहे. या घटनेत एका ८५ वर्षीय वृद्धेचा भाजल्यामुळे मृत्यू झाला आहे...

याबाबत पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार मुक्ताबाई ओंकार वाघोदे (Muktabai Waghode) (८५, रा. सावतानगर, साईबाबानगर, नवीन नाशिक) या (दि.१७) पावसात (Rain) भिजून घरी आल्या होत्या.

सावधान! ओले कपडे गॅसवर वाळवताय? आधी 'ही' बातमी वाचा
नाशिकच्या पालकमंत्रीपदी पुन्हा संकटमोचक महाजन?

दरम्यान पावसामुळे (Rain) त्यांचे कपडे ओले झाल्याने ते वाळवण्याकरिता त्यांनी घरातील गॅस पेटवला. मात्र यावेळी त्यांच्या कपड्यांनी पेट घेतला. दरम्यान यामुळे त्या गंभीररित्या भाजल्याने त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वपोनी भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शांताराम शेळके करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com