कादवा काठावरील गावांचा घसा कोरडा

कादवा काठावरील गावांचा घसा कोरडा

ओझे । विलास ढाकणे | Oze

दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) कादवा नदीपात्र (kadva river) संपूर्णपणे कोरडे पडल्यामुळे कादवा काठावरील ओझे (oze), म्हेळुस्के (Mheluske), लखमापूर (Lakhmapur), करंजवण (Karanjavan) आदी परिसरामध्ये पाणीटंचाई (Water scarcity) निर्माण झाली असून नदीपात्र कोरडे पडल्यामुळे जनावरासह वन्यजीवाना अस्तित्व धोक्यात येऊ पाहात आहे. त्यामुळे करंजवण धरणातून (Karanjavan Dam) आवर्तन सोडण्याची मागणी या परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

करंजवण धरणापासून अर्धा कि. मी. अंतरापासूनच नदीपात्र कोरडे पडले आहे. कादवा नदी (kadva river) परिसरातील गावामध्ये कादवा नदी असल्यामुळे जिल्ह्याच्या बाहेरून मोठ्या प्रमाणात मेंढपाळ दाखल झाले आहे. मात्र कादवा नदीपात्र कोरडे पडल्यामुळे मेंढपाळाना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नदीपात्र कोरडे झाल्यामुळे नदीपात्रात असणारे जलचराना मृत्यू झाला आहे. यामध्ये बेंडूक व लहान माशाचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे. शेतकर्‍यांच्या जनावरांना पिण्यासाठी पाणी नसल्याने त्यांना वणवण फिरावे लागत आहे. त्याचप्रमाणे गावामधील पाणीपुरवठा योजना (Water supply scheme) कादवा नदीलगत असल्यामुळे पाणीपुरवठा योजनेलाही पाणी टंचाईचा (Water scarcity) मोठा फटका बसत आहे.

हवामान खात्यांच्या अंदाजनुसार मागील दोन ते तीन वर्षापासून 25 मे ते 5 जून पर्यत या परिसरामध्ये समाधानकारक पाऊस पडल्यांमुळे पाणी टंचाई (Water scarcity) दूर झाली. आजच्या परिस्थितीचा विचार करता व हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडण्यासाठी फक्त 15 दिवस बाकी आहे. करंजवण धरणामध्ये मगील तीन वर्षाचा विचार करता पाणीसाठा समाधानकारक असून पाणी सोडण्यास अडचण नाही. मात्र पाठबंधारे विभागाकडून (Irrigation Department) पालखेड (palkhed) जलाशयात पाणी सोडण्याची मागणी झालेली नाही असे सांगण्यात येत आहे. म्हणजे जेव्हा येवला (yeola), निफाड (niphad) व मनमाडची (manmad) पाण्याची मागणी होईल तेव्हाच पाणी सुटणार का असा प्रश्न स्थनिक जनतेला पडला आहे.

अनेक वेळा खालच्या तालुक्यानी मागणी केल्यानंतरच करंजवण धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. म्हणजे पाटबंधारे विभाग (Irrigation Department) व प्रशासन स्थनिक जनतेची पाण्याची मागणी लक्षात घेत नाही असे दिसून येत आहे. स्थानिक जनतेची पाण्याची टंचाई लक्षात घेता करंजवण धरणातून आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी ओझे, म्हेळुस्के, लखमापूर, करंजवण आदी परिसरातील गावातील शेतकर्‍यांनी केली आहे.

दिंडोरी तालुक्यातील कादवा नदी परिसरातील ओझे, करंजवण, म्हेळुस्के, लखमापूर, अवनखेड, येथील शेतकर्‍यांनी पाणीवापर संस्था स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. करंजवण धरणामध्ये आपले पाणी आरक्षित नाही यासाठी बारमाहि पाणी वापर संस्था स्थापन कराव्यात, यासाठी सर्व प्रकारची मदत कादवा कारखाना संचालक मडळासह महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे हि करतील. यासाठी स्थानिक शेतकर्‍यांनी पाणीवापर संस्थांची स्थापना करावी व आपले पाणी आरक्षित करावे.

- श्रीराम शेटे, चेअरमन - कादवा सहकारी साखर कारखाना

चालू वर्षीचा विचार करता राज्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट असल्यामुळे नदीपात्रतील पाण्याचे बाष्पीभवन जास्त होत असल्यामुळे नदीपात्र आवर्तन बंद केल्यानंतर 5 ते 6 दिवसात नदीपात्र कोरडे पडत आहे. पाटबंधारे विभागाने आवर्तनाचे महिन्याच्या महिन्याला नियोजन केल्यास पाणी टंचाई निर्माण होणार नाही. नियोजन न करता एकच वेळी मोठ्या प्रमाणात पाणी सोडून दिले जाते. त्यामुळे कादवा नदीकाठावरील गावामध्ये पाणी टंचाई निर्माण होतो.

- दत्तात्रय गोजरे, शेतकरी ओझे

Related Stories

No stories found.