पाणी भरून जगवतायेत भात पीक!

उन्हामुळें भात पिकांवर सुकवा दुबार पेरणीचे संकट
पाणी भरून जगवतायेत भात पीक!

नाशिक | Nashik

भात बियाणाची पेरणी (Rice Sowing) केल्यानंतर पावसाने तब्बल पंधरा दिवस दडी मारल्यामुळे त्र्यंबक तालुक्यातील (Trimbak Taluka) शेतकरी हवालदिल झाला आहे.

दरम्यान त्र्यंबक तालुक्यात ज्या ज्या भागात भात पिकाची पेरणी झाली आहे. अशा ठिकाणची रोपे करपू (Crop Damage) लागली आहेत. त्यामुळे अनेक भागात तर पाणी भरून भात आवणी (Rice Cultivation) केली जात आहे. बहुतांश ठिकाणी दुबार पेरणी (Double Sowing) करण्यावर भर दिला जात आहे. भात पीक होरपळल्यामुळे पावसाच्या आगमनाकडे (Waiting For Rainfall) शेतकरी राजा आतुरतेने नजरा लावून बसला असून पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर तालुक्यात दुबार पेरणी करावी लागणार आहे.

साधारण कृषी विभागाच्या आवाहनानंतर (Agriculture Department) शेतकऱ्यांनी सुरवातीच्या पावसात भात पेरणी केली परंतु त्यानंतर पाऊसच गायब झाल्याने भात पिके होरपळू लागली आहेत. काही ठिकाणी पाणी भरून जगवण्याचा प्रयत्न केला जात आहे तर काही ठिकाणी दुबार पेरणी केली जात आहे.

भात उत्पादन ही या पट्टय़ातील अनेक वर्षांची परंपरा आहे. यंदा पेरणी झाल्यानंतर पावसाने सलग १५ दिवस पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. वैशाख वणव्यासारखे ऊन पडत असल्याने या कालावधीत बहरलेल पीक करपून चाललं आहे.

भात पीक करपून गेल्याने दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यात भात बियाणाची एक गोण ८०० ते १०० रुपयांना असते. त्यामुळे या परिस्थितीत नव्याने बियाणे आणायचे कोठून असा प्रश्न पडला आहे.

- नथु महाले, शेतकरी

पाऊस पडत नसल्यामुळे भात, नागली पिकांची लावणी रखडली आहे. आम्ही तर पाणी भरून आवणी केली पण उन्हामुळे लावलेली भात पीक वाया जाते की काय अशी भीती आहे. आवणीला आलेली रोपे उन्हाच्या तडाख्याने पिवळी पडून करपत आहे.

- संजय खोटरे, शेतकरी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com