मद्यधुंद कंटेनर चालकाचा येवल्यात प्रताप; अनेक वाहने चिरडली, एक ठार

मद्यधुंद कंटेनर चालकाचा येवल्यात प्रताप; अनेक वाहने चिरडली, एक ठार

येवला | प्रतिनिधी | Yeola

मनमाड-येवला-नगर महामार्गावर येवला शहरातील फत्तेबुरुज नाका, विंचूर चौफुली भागात कंटेनर चालकाने मद्यधुंद अवस्थेत अनेक दुचाकी, चार चाकी, ट्रॅक्टर, रिक्षाला चिरडले...

कंटेनर चालकाचा हा प्रताप अनकाईपर्यंत सुमारे १५ किमी सुरूच होता. अनेक वाहनांना कट मारत अनकाई शिवारात एका मोटारसायकलला धडकावत कंटेनर उलटला. या भीषण घटनेत तालुक्यातील विखरणी येथील रोशन मच्छिंद्र वाघमोडे (१९) हा जागीच ठार झाला आहे.तर पाच जण जखमी झाले आहेत.

मृत रोशनवर रात्री उशिरा विखरणी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी येवला तालुका पोलीस स्टेशनला जाफ़र एकबाल बरकत (३०, रा. मलहुत, जि. राजुरी, जम्मू काश्मीर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मद्यधुंद कंटेनर चालकाचा येवल्यात प्रताप; अनेक वाहने चिरडली, एक ठार
शरद पवारांचे निकटवर्तीय अनिरुद्ध देशपांडेंच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी

याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगावहून मनमाडकडे जाणाऱ्या कंटेनरने येवल्यातील दराडे पेट्रोल पंप ते येवला बस स्थानक दरम्यान अनेक वाहनांना धडका दिल्या. या घटनेत कंटेनर खाली अनेक वाहने चिरडली गेली. बनकर पंपा समोर धडक दिल्याने टरबूज विक्री करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह उलटला.

सावरगाव जवळ दुचाकीवरील कंटेनरने जोरदार धडक दिली. मद्यधुंद वाहनचालकाने अनेक वाहनांना चिरडले. येवला शहर हद्दीत घडलेल्या घटनेत एक जण ठार तर अनेक वाहनांचे नुकसान झाले. कोपरगाव ते मनमाडच्या दिशेने जाताना कंटेनरने आणखी वाहनांना धडक दिली. यात अनेक जण गंभीर जखमी झाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

मद्यधुंद कंटेनर चालकाचा येवल्यात प्रताप; अनेक वाहने चिरडली, एक ठार
रोजच्या वादातून प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल, प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह...

रोशन मच्छिंद्र वाघमोडे (वय १९) हा या अपघातात मयत झाला असून तो आपल्या आई व नातेवाईकसोबत लग्नाच्या खरेदीसाठी गेला असता ही दुर्दैवी घटना घडली. यावेळी त्याच्या सोबत त्याची आई व शेजारच्या काही महिला होत्या.

मद्यधुंद कंटेनर चालकाचा येवल्यात प्रताप; अनेक वाहने चिरडली, एक ठार
SSC HSC Exam : दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी, वेळेत झाला मोठा बदल

लग्न काही दिवसावर येऊन ठेपल्याने धावपळ सुरु होती. त्यातच अशी घटना घडल्याने विखरणी गावावर शोककळा पसरली आहे. वाहन चालकाला येवला शहर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com