मद्यधुंद कार चालकाची चौघांना धडक; एक ठार, तीन गंभीर

मद्यधुंद कार चालकाची चौघांना धडक; एक ठार, तीन गंभीर

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चारचाकी वाहन चालकाने अंबड (Ambad) येथील एक्सलो पॉइंट तसेच प्रणय स्टॅम्पिंग कंपनीसमोरून येत असणाऱ्या पादचारी आणि दुचाकी वाहनावरील नागरिकांना धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर इतर तीन पादचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित दीपक कुमार जांगिड (40, रा. पाथर्डी फाटा) हा रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत चारचाकी वाहनाने (एम. एच. ०२ सी. डी. २७९१) भरधाव वेगाने येत असतांना एक्सलो पॉईंट येथे दुचाकीस्वार प्रवीण महाले (एम. एच. १५, एच. डी ४९६५) (30 रा पारोळा,जिल्हा जळगाव) यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

त्यात त्यांना जबर मार लागला. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. तसेच तीन पादचारी विलास पोटे, शिवाजी जाधव, महेंद्र जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत.

यावेळी नागरिकांनी मद्यधुंद अवस्थेत असलेला चारचाकी चालकाला अंबड पोलिसांच्या (Ambad Police) ताब्यात दिले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपघाताचा (Accident) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नाहीद शेख करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com