नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

एक दिवसात किती लोकांची ड्रायव्हिंग टेस्ट घ्यावी याबाबत परिवहन अधिकार्यांना राज्य परिवहन आयुक्तालयाने कोटा निश्चित केला आहे.

त्याचप्रमाणे आता मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रशिक्षकांचा कोटा निश्चित करण्यात आला असून एक प्रशिक्षक एका दिवसात केवळ 25 जणांनाच प्रशिक्षण देऊ शकणार असल्याचे समजते.

मोटार ड्रायव्हिंग स्कूलकडून नवशिक्या चालकांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. मात्र अनेक ठिकाणी एका बॅचमध्ये तीन ते चार प्रशिक्षणार्थी घेतले जातात. त्यामुळे त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही.

तसेच संबंधित प्रशिक्षणार्थीला मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर चालक प्रशिक्षण प्रमाणपत्र (नमुना 5) आणि इंधन बचत प्रमाणपत्र (नमुना 5 अ) प्रदान केले जातात.

मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी याचे प्रमाण व्यस्त असल्याचे आढळून आले आहे. प्रशिक्षणार्थ्यांच्या संख्येपेक्षा प्रशिक्षकांचे प्रमाण कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यावर निर्बंध घालण्याचा निर्णय परिवहन आयुक्तालयाने घेतला आहे.

आता एका प्रशिक्षणार्थ्याने केवळ 25 उमेदवारांना प्रशिक्षण द्यावे, असे निश्चित केले आहे. एखाद्या प्रशिक्षण संस्थेकडे केवळ नमुना 5 अ देण्यासाठी स्वतंत्र वाहन व प्रशिक्षक उपलब्ध असेल तर अशा परिस्थितीत जास्तीत जास्त 30 प्रमाणपत्रे देता येऊ शकतील. या निर्णयाची अंमलबजावणी 1 मे 2021 पासून केली जाणार आहे.