शिवशाही बसमधील 'त्या' आत्महत्येचा अखेर उलगडा; गुन्हा दाखल

शिवशाही बसमधील 'त्या' आत्महत्येचा अखेर उलगडा; गुन्हा दाखल

वावी | वार्ताहर | Vavi

शिवशाही बसमध्ये (Shivshahi Bus) गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) करणाऱ्या राजेंद्र हिरामण ठुबे यांनी आत्महत्या का केली? याचा उलगडा झाला आहे. चालकाच्या आत्महत्येप्रकरणी त्या दिवशी त्यांच्यासोबत असलेल्या महिला वाहक व तिची बहीण आणि आणखी दोन जण अशा चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाच्या खिशात असलेल्या नोटांमध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला आहे...

याप्रकरणी चालकाचे वडील हिरामण रघुनाथ ठुबे (७०) यांनी वावी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून वाहक नीलिमा नंदू वानखेडे, रा. जेलरोड, तिची बहीण प्रमिला इंगळे आणि अन्य दोघे ठक्कर बंधू (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात चालक राजेंद्र ठुबे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोनवाडे, पो. विंचूर दळवी, ता. नाशिक येथील शिवशाही बस चालक राजेंद्र ठुबे हे २०१३ साली चालक म्हणून परिवहन महामंडळात भरती झाले. त्यानंतर गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वी महिला वाहक नीलिमा वानखेडे यांच्याशी त्यांची ओळख झाली. या ओळखीतून वानखेडे यांनी ठुबे यांच्याकडून वेळोवेळी ४ लाख ५८ हजार ९६१ रुपये उसने घेतले.

शिवशाही बसमधील 'त्या' आत्महत्येचा अखेर उलगडा; गुन्हा दाखल
Nashik Crime : जेलरोडला धारदार शस्त्राने एकाचा खून

त्यापैकी ६० हजार रुपये परत केले. उर्वरित पैशांची ठुबे यांनी वारंवार मागणी करूनही वानखेडे यांनी ते परत दिले नाही. याउलट पैसे मागितले म्हणून नीलिमा वानखेडे, त्यांची बहीण प्रमिला इंगळे आणि अन्य दोघे ठक्कर बंधूंनी ठुबे यांना शिवीगाळ दमदाटी केली.

वारंवार होणाऱ्या जाचाला कंटाळून ठुबे यांनी २४ मेच्या रात्री सिन्नर-शिर्डी महामार्गावर पांगरी शिवारात शिंदे वस्ती नजिक नादुरुस्त झालेल्या शिवशाही बसमध्ये (एमएच ०९ ई एम १२८०) इमर्जन्सी रूफच्या हँडलला कमरेच्या कर दोऱ्याच्या साह्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

शिवशाही बसमधील 'त्या' आत्महत्येचा अखेर उलगडा; गुन्हा दाखल
Nashik Crime : सप्तशृंगी देवी मंदिरात चोरी, ग्रीलमधून हात घालत पादुका लंपास

याबाबत मयत हिरामण यांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडेच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय सोनवणे, पोहवा सतीश बैरागी तपास करीत आहेत.

'असा' झाला उलगडा

घरात सर्व काही सुरळीत असताना वडिलांनी आत्महत्या का केली? याचे कोडे लष्करात नोकरी करणाऱ्या त्यांच्या मुलांना पडले होते. मयताच्या खिशात सापडलेला मोबाईल आणि पैसे पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिले होते. अंत्यविधीनंतर हे पैसे मोजून घेत असताना कुटुंबीयांना पैशाच्या नोटेमध्ये दुमडून ठेवलेली चिठी सापडली आणि त्यानंतर राजेंद्र ठुबे यांच्या आत्महत्ये‌मागील कारण समोर आले.

शिवशाही बसमधील 'त्या' आत्महत्येचा अखेर उलगडा; गुन्हा दाखल
Nashik Road : रेल्वेखाली उडी घेत पती-पत्नीची आत्महत्या
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com