चालकदिनी होणार चालकांचे करोना लसीकरण

चालकदिनी होणार चालकांचे करोना लसीकरण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

रात्रंदिवस वाहतूक (Transport) क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या चालकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Corona preventive vaccination) करून चालक (Driver) व त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवण्यासाठी दि.१७ सप्टेंबर २०२१ रोजी चालक दिनाचेक (Driver's Day) औचित्य साधत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या (Nashik District Transport Association) वतीने व नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation)

सहकार्यातून लक्ष्मी नारायण लॉन्स, कोणार्क नगर नाशिक (Nashik) येथे सकाळी ९ ते ३ या वेळेत २०० चालकांचे लसीकरण (Vaccination of drivers) करण्यात येणार आहे. त्याचबरोबर २५ वर्ष आपघात रहित सेवा देणाऱ्या २५ चालक यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम सैनी यांनी दिली आहे.

देशात १७ सप्टेंबर हा चालक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. यंदाच्या वर्षी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्यातून २०० चालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर २५ वर्ष अपघात रहित सेवा बजावलेल्या २५ चालकांचा सत्कार करण्यात येणार असून प्रादेशिक परिवहन विभागाच्या (Regional Transportation Department) वतीने वाहतूक नियमबाबत मार्गदर्शन (Guidance on traffic rules) करण्यात येणार येऊन चालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात वाहतूक व्यवसाय पूरक कंपन्या टाटा मोटर्स, इंडूलूब ऑईल, श्रीराम फायनान्स आदी सहभागी होतील. या कार्यक्रमाचे नियोजन चेअरमन संजू राठी व सह.चेरमन महेंद्रसिंग राजपूत हे करत आहे अशी माहिती नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com