वाहनचालकाचा प्रामाणिकपणा; सोने, रोकड व कागदपत्रे केले परत

वाहनचालकाचा प्रामाणिकपणा; सोने, रोकड व कागदपत्रे केले परत

सप्तशृंगीगड। वार्ताहर Saptashringigad - Vani

आपल्या वाहनामध्ये दोन तोळे सोने (gold), काही रोकड (cash) व आवश्यक कागदपत्रे (documents) मिळाली असता पोलिसाच्या (police) माध्यमातून त्या इसमाचा शोध घेत सोने परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन सप्तशृंगगडावरील (Saptashringigad) खाजगी प्रवाशी वाहनचालक (driver) नानासाहेब कदम (nanasaheb kadam) यांच्याकडून घडले असता सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला.

नाशिक (nashik) येथील कुलकर्णी नावाचे भाविक भक्त आई सप्तशृंगी चरणी नाशिक ते सप्तशृंगीगडावर दर्शनासाठी आले होते. दर्शन करुन परत जाताना खाजगी प्रवाशी वाहनाने ते नाशिकला पोहचले. त्यानंतर ते नाशिकला पोहचल्यानंतर इतर वाहनाने घरी गेल्यानंतर त्यांना अचानक सोने व पैसे हरवल्याची चाहुल लागली. त्यांनी शोधाशोध सुरू केली मात्र काही मिळून आले नाही.

सप्तशृंगी गडावर नाशिक ते सप्तशृंगी गड (Nashik to Saptashrungi gad) वाहन चालवून उदरनिर्वाह (Subsistence) करणारे नानासाहेब कदम यांच्या खाजगी वाहनामध्ये साफ सफाई करत असतांना पावणे दोन तोळे सोने व चार हजार रोख रक्कमेचे पर्स सापडली. त्यातमध्ये सोबत आधारकार्ड (Aadhaar card) असल्याने या ओळखपत्राच्या माध्यमातून शोध लावण्यासाठी नानासाहेब कदम यांनी सप्तशृंगी गडाच्या हद्दीतील नांदुरी पोलीस ठाण्यात (Nanduri Police Station) धाव घेतली.

भाविक भक्ताचे हरवलेले मौल्यवान सोने व रोख रक्कम सदर भाविकाचा शोध घेऊन परत द्यावे, अशी अपेक्षा कदम यांनी व्यक्त केली. त्यानुसार आधारकार्डच्या साहाय्याने पोलिसांनी त्या इसमाचा शोध घेत ओळख पटवून सापडलेले सोने व रक्कम परत केली. याच प्रामाणिक पणाचा आदर घेऊन सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट विसवस्त दीपक पाटोदकर यांनी नानासाहेब कदम यांचे सत्कार केला. सर्व वाहतूक चालकांनी नानासाहेब कदम यांच्या आदर्श घ्यावा असे आवाहन विश्ववस्त पाटोदकर यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com