मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना ड्रेसकोड

शिक्षण व्यवस्थापन समिती तपासणार गणवेश गुणवत्ता
मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना ड्रेसकोड

नाशिक । प्रतिनिधी Nashik

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत Under the overall education campaign शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती,जमातीची मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश वाटप केले जातात. विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या या गणवेशाची गुणवत्ता School Uniform आता महापालिकेच्या शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीमार्फत तपासली जाणार असून, विद्यार्थ्यांमधील गणवेशांचे वेगळेपण संपवून सर्वच विद्यार्थ्यांना ड्रेसकोड देण्याचा निर्णय यानुसार घेण्यात आला आहे.

नाशिक महापालिकेच्या 96 हून अधिक शाळा असून NMC Schools , त्यात जवळपास 27 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत वर्षातून दोन गणवेश दिले जातात. एका गणवेशासाठी तीनशे रुपये पालकांच्या बंँक खात्यात जमा केले जात होते. परंतु, त्या पैशांचा विनियोग गणवेशासाठी होत नसल्याने शालेय व्यवस्थापन समितीमार्फत गणवेश दिला जात आहे.

दरम्यान, करोना महामारीमुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने शाळा मागच्या वर्षी प्रत्यक्ष भरल्या नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश देता आले नाही. मात्र दुसर्‍या लाटेनंतर आटोक्यात आलेली रुग्ण संख्या आणि परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. असे असले तरीदेखील यावर्षी पहिले सत्र शाळेविना गेले. आता दुसर्‍या सत्रात पहिली पासून पुढे सगळयाच वर्गांना परवानगी मिळून शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी- विद्यार्थिनींना एक गणवेश दिला जाणार आहे. प्रत्येक गणवेषासाठी तीनशे रुपये दिले जाणार आहेत. परंतु शालेय व्यवस्थापन समितीमार्फत गणवेशाचे कापड

वाटप करताना काही ठिकाणी हलक्या दर्जाचे कापड आढळून आले. तसेच शाळानिहाय गणवेशाचे रंग वेगवेगळे असल्याने नेमके महापालिकेचे विद्यार्थी लक्षात येत नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना दुसर्‍या सत्रात गणवेशाचे वाटप करताना गुणवत्ता तपासण्याचा निर्णय Decision to check quality while distributing uniforms शिक्षण समितीने घेतला आहे.

दरम्यान, 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये राज्यातील शासकीय शाळांमध्ये प्राथमिक स्तरावरील इयत्ता 1 ली ते 8 वी मधील एकूण 36 लाख 32 हजार 281 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश समग्र शिक्षा या योजनेअंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार योजनेमधून 23 लाख 50 हजार 505 एवढ्या मुलींकरिता 4 लाख 59 हजार 281, अनुसूचित जमातीतील मुलांकरिता 3 लाख 40 हजार 952 एवढ्या अनुसूचित जातीतील मुलांकरिता व 4 लाख 81 हजार 543 दारिद्रय रेषेखालील मुलांकरिता मोफत गणवेश उपलब्ध करुन देण्यात येणार होते.

तपासणी करण्याचा उद्देश

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गणवेशाचे मोफत वाटप करण्यात येतं असले तरी प्रत्यक्षदर्शी इतर खासगी शाळेच्या तुलनेत त्याच्या गुणवत्तेत सुधारणा होण्याला वाव आहे. मुलांमध्ये आतापासूनच स्वच्छ आणि निरोगी राहण्याच्या दृष्टीने गणवेशही महत्वाचा घटक आहे. त्यामुळे विद्यार्थ्याना उत्तम गुणवत्तेचे गणवेश देण्यासाठी त्याची गुणवत्ता तपासणी करणे गरजेचे आहे.

लाभासाठी आर्थिक निकष

एका गणवेश संचासाठी तीनशे रुपये या प्रमाणे दोन गणवेश संचासाठी प्रती लाभार्थी सहाशे रुपये या दराने भारत सरकारकडून तरतूद मंंजूर करण्यात येते. समग्र शिक्षा योजनेअंतर्गत या उपक्रमासाठी मंजूर झालेल्या निधीचा विनियोग संबंधित शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने केला जातो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com