नाशकात नाट्यकलावंताचा अपघाती मृत्यू

अपघात | Accident
अपघात | Accident

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गौळाणे फाट्याच्या (Gaulane Phata) वळणावर अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने त्यात अहमदनगर (Ahmednagar) येथे राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार घेण्यासाठी जाणाऱ्या कलावंताचा मृत्यू झाल्याची घटना घडली...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक संदीप निकम (Pratik Nikam) (20, रा. आयुक्त निवास स्टॉप कॉटर्स, नेरूळ, नवी मुंबई) हे त्यांच्या वडिलांना राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार मिळाल्याने तो घेण्यासाठी त्याची पल्सर मोटारसायकल (एम. एच. 03 डी. ई. 9063) वरून अहमदनगर येथे जात होते.

विल्होळी फाटा, जलशुद्धीकरण केंद्रासमोर मुंबईहून नाशिकच्या दिशेने येत असताना अज्ञात पांढऱ्या रंगाच्या भरधाव चारचाकीने त्यांना ठोस (Accident) मारली. त्यात प्रतीकचे वडील संदीप खंडू निकम यांचा मृत्यू झाला. तर प्रतिक गंभीर जखमी झाला.

संदीप निकम हे नवी मुंबई महानगरपालिकेत शिपाई या पदावर कार्यरत होते व नाट्य कलावंत देखील होते. याप्रकरणी पुढील तपास वपोनी भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक शांताराम शेळके करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com