गंगाघाटावरील ड्रेनेजलाइनच्या कामाचा नागरिकांना त्रास

मशीन्सच्या आवाजाने नागरिक त्रस्त
गंगाघाटावरील ड्रेनेजलाइनच्या कामाचा नागरिकांना त्रास

पंचवटी । Panchavti

गंगाघाटावर गेली आठ महिन्यांपासून सुरू असलेले ड्रेनेजलाइनचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने स्थानिक रहिवाशी आणि व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणावर समस्याना सामोरे जावे लागत आहे. स्मार्टसिटी अंतर्गत रामकुंड कपालेश्वर मंदिर ते अहिल्याराम व्यायामशाळा पर्यतच्या मार्गावर ड्रेनेजलाईनचे काम गत काही महिन्यांपासून सुरू आहे.

यासाठी गंगाघाटावरच्या रस्त्यावर सध्या अहिल्याराम व्यायामशाळा भागातील रस्ता खोदून काम सुरू आहे. या भागातील खोदकाम केलेले बाजूला काही अंतरावर सुरक्षेसाठी बॅरेकेटस् लावण्यात आलेले आहे. मात्र यापूर्वी अनेकवेळा काम सुरू असताना पादचारी नागरिक अथवा दुचाकी पडण्याचा घटना झाल्या आहेत. प्रामुख्याने काम सुरू असताना काही भागात मोठया प्रमाणात कडक खडक लागल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खडक फोडण्यासाठी डायमंड कटर आणि पोकल्यानचा वापर केला जात आहे . मात्र पोकलँड मुळे रस्त्यालगत असलेल्या घराना हादरे बसत असून स्थानिक लोक भीतीच्या छत्रछायाखाली आहे.

त्याच प्रमाणे खडक फोडताना जमिनीखाली वारंवार पाणी लागत असल्याने पाणी उपसा करण्यासाठी ज्या मोटारीचा वापर केला जातो, तिचा दर्जा देखील चांगला नसल्याने कधी कधी दिवस जातो. पाईप टाकण्यासाठी रस्ता खोदत असताना अनेक रहिवाशीयांच्या पाण्याची तसेच ड्रेनेजलाईनचे नुकसान झाले. दिवसभर मशीनच्या आवाजामुळे रहिवाशी, दुकानदार त्रस्त झाले आहे. यातच घरातील आजारी , वयोवृद्ध व्यक्तींना याचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे.

करोनामुळे गेल्या वर्षभरापासून स्थानिक दुकानदार आधीच आर्थिक संकटात सापडलेले असताना त्यात काम सुरू असल्याने काहींनी आपली दुकान बंद ठेवली आहे. जी थोडीफार दुकाने आहे. अशा दुकानदाराकडे येण्यासाठी रस्ता नसल्याने गिऱ्हाईक फिरकत नाही. हे काम सुरू असल्याने रामकुंड ते सरदार चौक परिसरा पर्यतच्या मार्गच बंद असल्याने वाहतूक दुसऱ्या मार्गावरून वळविण्यात आली आहे. याचा सर्वांना त्रास सहन करावा लागत असल्याने लवकरात लवकर काम मार्गी लावण्यासाठी योग्य नियोजन करून या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी होत आहे.

ड्रेनेजलाईनचे काम सुरू असल्याने स्थानिक दुकानदार आणि रहिवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दिवसभर मशीनचा आवाज, घराकडे जाण्यासाठी असलेले रस्ते व्यवस्थित नाही. घरात पेंशट असल्याने दिवसभर मशीनच्या आवाजाचा त्रासाने अधिक भर पडते

- गणेश कमरे, रहिवाशी

कोरोनामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला असताना येथील कामामुळे दुकानदार देखील अडचणीत सापडले आहे. खोदकाम सुरू असताना खडक लागल्याने अडचणीत भर पडत आहे. योग्य नियोजनाअभावी संथगतीने काम सुरू असून लवकरात लवकर काम झाल्यास स्थानिक रहिवाशी आणि दुकानदार या संकटातून मुक्त होईल.

- वैभव क्षेमकल्याणी, व्यावसायिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com