डॉ. हुसेन रुग्णालय दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना सुपूर्द

डॉ. हुसेन रुग्णालय दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना सुपूर्द

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय येथील ऑक्सिजन गळतीच्या दर्घटनेत कोविड कक्षातील 22 रुग्णांचा मृत्यु झाला होता. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखाची मदत शासनाने जाहिर केली होती...

त्याप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

ऑक्सिजन दुर्घटनेत मृत झालेले 22 रुग्णांपैकी 16 मृतांच्या वारसांना पाच लाखाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरीत पंढरीनाथ नेरकर, प्रमोद वालूकर,आशा शर्मा, बापूसाहेब घोटेकर, वत्सलाबाई सुर्यवंशी,नारायण गंगा इराक या 6 मृतांच्या वारसांना तांत्रिक बाबींची पूर्तता करुन लवकरच धनादेशाचे वितरण करण्यात येणार आहे.

या मृतांच्या वारसांना करण्यात आले धनादेशाचे वितरण

ऑक्सिजन दुर्घटनेत मृत झालेले अमरदीप नारायण नगराळे, भारती बंडू निकम , श्रावण रामदास पाटील, मोहना देवराम खैरनार, सुनिल भिमा झाल्टे, सल्मा फकीर मोहम्मद शेख, भैय्या सांदूभाई सैय्यद, प्रवीण पिरसिंग महाले , मंशी सुरेन्द्र साह, सुगंधाबाई भास्कर थोरात, हरणबाई ताटेराव त्रिभुवन, रजनी रत्नाकर काळे, गिता रावसाहेब वाकचौरे, संदीप हरीश्चंद्र लोखंडे, बुधा लक्ष्मण गोतरणे , वैशाली सुनिल राऊत यांना धनादेश अदा करण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com