Video : ऑक्सिजन गळतीचे सीसीटीव्ही फुटेज; पाहा काही सेकंदात झाले होत्याचे नव्हते...

Video : ऑक्सिजन गळतीचे सीसीटीव्ही फुटेज; पाहा काही सेकंदात झाले होत्याचे नव्हते...

नाशिक | प्रतिनिधी

करोनाबाधित असलेल्या २४ रुग्णांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळती नेमकी कशी झाली. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. अवघ्या काही सेकंदामध्ये या परिसरात ऑक्सिजन लिकेज होऊन सर्वत्र पांढरा वायू पसरल्याने लिकेज शोधणे कठीण झाले होते...

Title Name
नाशिकनंतर दुसरी मोठी दुर्घटना : विरार रुग्णालयास आग: १३ जणांचा मृत्यू
Video : ऑक्सिजन गळतीचे सीसीटीव्ही फुटेज; पाहा काही सेकंदात झाले होत्याचे नव्हते...

ऑक्सिजन टंकरमधून ऑक्सिजन रुग्णालयाच्या टाकीत भरत असताना दाब वाढल्याने दाब नियंत्रणात राहिला नाही. यामुळे टाकीच्या पाईपमधून गळतीला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, काही सेकंदातच पांढरा वायू सर्वत्र पसरल्याने उपस्थित नागरिकांनी या ठिकाणाहून पळ काढत सुरक्षित स्थळी धाव घेतली.

ऑक्सिजन टँकच्या नॉबमधून गळती झाली असताना तो नॉब पूर्ववत करण्यामध्ये एकूण 32 मिनिटांचा कालावधी गेल्याचे समोर आले आहे. यामुळे ऑक्सिजन अभावी २२ रुग्णांना जीव गमवावा लागला. तर त्याच वार्डमधील आणखी दोघांचा त्यानंतर मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या २४ वर पोहोचली आहे.

नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना घटनाक्रम

12:03 वाजता ऑक्सिजन टँकरमधून,या झाकीर हुसेन रुग्णालयातील,ऑक्सिजन टॅन्कमध्ये,ऑक्सिजन रिफिल करण्यासाठी, पाईप जोडणीला सुरुवात झाली. त्यानंतर 12:12 वाजता टॅन्कमध्ये ऑक्सिजन भरण्यास सुरुवात, इनलेट कॉकजवळ प्रेशर वाढल्याने गळतीला सुरुवात झाली.

12:13 वाजता अवघ्या एक मिनिटात, प्रेशरचा दाब प्रचंड वाढला. द्रवरूप ऑक्सिजन बाहेर पडायला सुरुवात झाली. 12:14 वाजता बघता बघता, बर्फाच्छादित द्रवरूप ऑक्सिजनचे अक्षरशः लोट पसरले. 12:15 वाजता रुग्णालयात पुरवठा होणारा, ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला.

12:16 वाजता अग्निशमन यंत्रणेचे आगमन झाले. 12:26 वाजता पाण्याची फवारणी सुरू झाली. 12:28 वाजता मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी प्रोटेक्ट मास्क लावून धुक्यात प्रवेश केला. गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

12:30 वाजता गळती होत असलेला कॉक सापडला. 12:32 वाजता गळती रोखण्यात यश आले. 12:34 वाजता रुग्णालयात पोहोचणारा, लिक्विड ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. 12.36 वाजता ऑक्सिजन गळती नियंत्रणात आली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com