नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शल्य चिकित्सकपदी डॉ. अशोक थोरात यांच्या नियुक्तीचे आदेश बुधवारी (दि. ७) रात्री राज्य सरकारने काढले. थोरात यांना तत्काळ हजर होण्याचे आदेश अवर सचिव विष्णूदास घोडके यांनी दिले. त्यानुसार थाेरात यांनी दुपारीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत जिल्हा रुग्णालयात जाऊन कार्यभार स्विकारला.

कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. थोरात यांच्या आदेशात डॉ. रावखंडे या वैद्यकीय कारणास्तव रजेवर गेल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने डॉ. थोरात यांनी तातडीने पदभार स्वीकारावा, असे घोडके यांनी आदेशात नमूद केले आहे. केंद्राचे पथक महाराष्ट्र दौर्यावर येत असल्याने राज्य सरकारने तातडीने पावले उचलत डॉ. थोरात यांची जिल्हा रुग्णालयाच्या शल्य चिकित्सकपदी नियुक्ती केली आहे.