डॉ. सुधीर तांबेंच्या 'या' कृतीने घडविले माणुसकीचे दर्शन

डॉ. सुधीर तांबेंच्या 'या' कृतीने घडविले माणुसकीचे दर्शन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक पदवीधर विधानपरिषदेचा आज निकाल लागणार आहे. मात्र सत्यजीत तांबे यांचे निकटवर्तीय नाशिक ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन झाले....

मानस पगार हे सत्यजित तांबे यांचे अत्यंत जवळचे सहकारी समजले जातात. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच घटना घडली आहे. सत्यजित तांबे यांनी स्वतः ट्विट करत आपल्या जवळच्या सहकाऱ्याला श्रद्धांजली व्यक्त केली आहे. मानस पगार यांच्या पार्थिवावर आज पिंपळगाव बसवंत येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सत्यजीत तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे हे मतमोजणीच्या ठिकाणी न जाता ते अत्यसंस्कारासाठी हजर झाले आहेत. राजकारणातील तरुण चेहरा म्हणून मानस पगार यांना ओळखले जात होते. मानस पगार हे नाशिक जिल्ह्यातील लोकप्रिय तरुण नेते होते. अचानक झालेल्या अपघातामुळे पगार यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

डॉ. सुधीर तांबेंच्या 'या' कृतीने घडविले माणुसकीचे दर्शन
नाशिक पदवीधर निवडणूक : मतमोजणी केंद्रावर गोंधळ

बुधवारी रात्री उशिरा नाशिक-मुंबई महामार्गावरील कन्नमवार पुलाजवळ समोरुन येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. धडक एवढी भीषण होती की यात कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. कारची पुढील बाजुचा पूर्णपणे चुराडा झाल्याने मानस पगार यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

डॉ. सुधीर तांबेंच्या 'या' कृतीने घडविले माणुसकीचे दर्शन
नाशिक पदवीधर निवडणूक : काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रचार केला नाही? शुभांगी पाटील म्हणाल्या...
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com