डॉ. शिंदे आत्महत्या प्रकरण : फॉरेन्सिक विभागाकडे अहवालाची मागणी

डॉ. शिंदे आत्महत्या प्रकरण : फॉरेन्सिक विभागाकडे अहवालाची मागणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आडगाव येथील मेडिकल कॉलेजमधील (Medical College) शिकाऊ डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पोलिसांकडे संबंधित अहवाल मागवला आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाला (Forensic Department) पत्र देत अहवाल तात्काळ मिळावा याबाबत लिहिले आहे...

प्रशिक्षणार्थी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील शिंदे (Dr. Swapnil Shinde) यांनी मेडिकल कॉलेजमध्ये शस्त्रक्रिया कक्षाच्या वॉशरूममध्ये आत्महत्या केली होती. डॉ. शिंदे यांच्या कुटुंबियांनी हा घातपात असून मुलाला मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला.

मृत्यूपूर्वी मिळालेल्या चिठ्ठीमध्ये दोन डॉक्टर मुलींच्या नावाचा उल्लेख असून रॅगिंग असल्याचा संशय व्यक्त करत कारवाई करावी, यासाठी आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन केले होते. याची दखल घेत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी आरोग्य विज्ञापीठाला चौकशीचे आदेश दिले.

शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, छातीच्या फासळ्या तुटल्याचे निदान करण्यात आले आहे. याबाबत वार्डबॉय आणि तक्रारीत नावे असलेल्या महिला डॉक्टरांचे जबाब नोंदवले आहे.

शवविच्छेदनात संशयास्पद बाबी आढळल्यास अथवा नातेवाइकांची तक्रार असल्यास व्हिसेरा राखून ठेवला जातो. व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्यानंतर दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागतो. डॉ. स्वप्नील शिंदे आत्महत्या प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी लॅबच्या वैद्यकीय अधीक्षकांना अहवाल तत्काळ मिळावा, यासाठी पत्र दिले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com