डॉ. पवार थोर समाजसेवक

अमृता पवार यांचे प्रतिपादन
डॉ. पवार थोर समाजसेवक

सिन्नर। प्रतिनिधी Sinnar

स्व. डॉ.वसंतराव पवार (Late. Dr. Vasantrao Pawar) एक थोर समाजसेवक (social worker) आणि आदर्श वडील होते. आपले बोलणे, वागणे आणि प्रामाणिकपणा (Honesty) हीच आपली खरी ताकद आहे असे ते नेहमी म्हणायचे. स्वच्छता आणि निटनेटकेपणा यांचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळालेला होता.

समाजकारणाचा वारसा त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळालेला आहे. निलिमाताईना (Nilima Pawar) त्यांनी प्रत्येक वेळेस संधी दिली आहे. आपल्या पत्नीने फक्त घर सांभाळणे त्यांना मान्य नव्हते. त्यांच्या या स्वभावामुळेच आज त्या समर्थपणे डॉक्टरांचे कार्य पुढे चालवत असल्याचेे प्रतिपादन अमृता पवार (Amruta Pawar) यांनी केले. सिन्नर (Sinnar) महाविद्यालयात डॉ. वसंतराव पवार (Dr. Vasantrao Pawar) यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मविप्र (MVP) संचालक हेमंत वाजे (Hemant Vaje) होते.

यावेळी त्यांनी डॉ. पवार यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंची माहिती दिली. त्यांच्या ज्ञात असलेल्या कार्याबरोबरच ते पसायदान छान म्हणायचे, हॉर्स रायडिंगची त्यांना आवड होती, अन्नाबद्दल त्यांना प्रचंड आदर होता, चार तासांपेक्षा जास्त झोप त्यांनी कधीही घेतली नाही. आपल्या मुलांवर शिक्षणासाठी त्यांनी कधी दबाव आणला नाही. ते इतरांसाठी डॉक्टर (Doctor), खासदार (MP), शिक्षणसंस्था चालक, साहेब वगैरे होते.

मात्र, आमच्यासाठी ते सदैव वडीलच राहिले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्था (Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha) आणि आपले आई-वडील यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये प्रचंड आदर होता. त्यांच्या त्यागामुळेच आज संस्थेने मोठी झेप घेतली असल्याचे त्या म्हणाल्या. रुग्णांच्या संबंधाने डॉक्टरांसोबत आलेल्या जवळकीचे विविध अनुभव वाजे यांनी सांगितले. स्पष्टवक्तेपणा आणि वेळेला महत्त्व यांसारख्या गुणांमुळेच ते सर्वांना परिचित होते.

कोणत्याही गोष्टीची आपण सुरुवात करणे महत्त्वाचे आहे, असे ते नेहमी म्हणायचे अशी आठवण त्यांनी करुन दिली. डॉ. पवार म्हणजे सामाजिक, शैक्षणिक, कृषी, अध्यात्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले थोर व्यक्तिमत्व असल्याचे प्राचार्य डॉ. पी.व्ही.रसाळ म्हणाले. शिस्त, गुणवत्ता, पारदर्शकता या त्रिसूत्रीवर त्यांचे संपूर्ण जीवन आणि कार्य आधारित होते.

आपल्या कुटुंबाला सामाजिक कार्याचा वारसाही डॉक्टरांनीच दिला. संस्थेला आई मानले व तिचा कायापालट केल्याचे त्यांनी सांगितले. सुत्रसंचलन योगेश भारस्कर यांनी केले. आभार डॉ. एस. एन. पगार यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य आर. व्ही. पवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. व्ही. सोनवणे, आयटीआयचे प्राचार्य भामरे व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

Related Stories

No stories found.