नाशिकच्या 'त्या' घटनेची डॉ.नीलम गोऱ्हेंनी घेतली दखल; पोलीस महासंचालकांकडे केली 'ही' मागणी

डॉ. नीलम गोर्‍हे
डॉ. नीलम गोर्‍हे

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील (Nashik district) चांदवड तालुक्यातील (Chandwad taluka) शिवरे गावात (Shivre village) एका विधवा महिलेला पतीच्या दशक्रिया विधीच्या दिवशी पतीच्या नातेवाईकांनी मारहाण करत गळ्यात चपलांचा हार घालून गावातून धिंड काढण्याची घटना घडली होती...

त्यानंतर या घटनेमुळे राज्यात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर आता या घटनेची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी (Dr Neelam Gorhe) गंभीर दखल घेतली असून राज्याच्या पोलीस महासंचालकांना (Director General of Police) पत्र लिहित दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.

गोऱ्हेंनी पत्रात म्हटले आहे की, नाशिक येथील चांदवड तालुक्यातील शिवरे गावात पतीच्या मृत्यूचे (Death) कारण विचारले म्हणून त्याच्या पत्नीला चपलांचा हार घालत तिचे तोंड काळे करून या विधवेची धिंड काढली. याबाबत पीडित महिलेने (Women) आरोपींवर गुन्हा दखल केला आहे. तसेच पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित महिला आजारपणामुळे माहेरी होती. त्यांनतर १० दिवसात तिच्या पतीने आत्महत्या केली.

याबाबत तिला संशय आल्याने ही आत्महत्या (Suicide) नसून हत्या असल्याबाबत गावात चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे गावातील लोकांनी व नातेवाईकांनी तिची गावात तोंड काळे केले व चपलांचा हार घालून विधवेची धिंड काढली. याबाबत तक्रार दाखल करूनही अद्याप आरोपींवर कारवाई झाली नसल्याचे तेथील सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनासआणून दिले आहे. यासंदर्भात तात्काळ कारवाई करून आरोपींना अटक करून कडक कारवाई करण्याची सूचना सदर पत्राच्या माध्यमातून आपल्याकडे करत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

चांदवड तालुक्यातील शिवरे या गावी एका कुटुंबातील विवाहितेचा किरकोळ अपघात होऊन हात फ्रॅक्चर झाला होता. त्यावेळी तिच्या हाताला प्लास्टर केले असल्याने देखभालीसाठी पतीने तिला माहेरी आणून घातले. त्यानंतर पती आपल्या दोन मुलींसह एक-दोनदा भेटायलाही गेला. पंरतु,पत्नी माहेरी असतानाच पतीचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले. यानंतर पत्नीला पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पतीच्या दशक्रियाविधीला आलेल्या पत्नीने माझे पती आत्महत्या करणार नाहीत त्यांचा घातपात झाला असेल,असा संशय व्यक्त केला. त्यावेळी पतीच्या नातेवाईकांनी तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. यानंतर इतर महिलांनी त्या महिलेची सुटका केली. तसेच त्या विधवा महिलेचे तोंड काळे करून तिला चपलांचा हार घालत गावभर धिंड काढली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com