नाशिक मनपा
नाशिक मनपा
नाशिक

डॉ. त्र्यंबकेंच्या जागी नागरगोजेंची नियुक्ती

अखेर मनपाला मिळाला आरोग्य अधिकारी

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

नाशिक महानगरपालिकेला सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर आता करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर चार वर्षानंंतर शासनाकडुन आरोग्य वैद्यकिय अधिकारी मिळाला आहे. महापालिकेत गेल्या काही महिन्यापासुन प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांच्या जागी शासनाकडुन डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांची नियुक्ती केली आहे. करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शासनाने ही नियुक्ती केली आहे.

नाशिक महापालिकेत अलिकडे परसेवेतून मोठ्या संख्येने अधिकारी दाखल झाले असुन महापालिकेत भरती झालेले बहुतांशी अधिकारी सेवानिवृत्त झाले आहे. यामुळे महापालिकेत अधिकार्‍यांचा वानवा असल्याने आजही अनेक पदावर प्रभारी म्हणुन अधिकारी काम करीत आहे. सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेत शासनानकडुन महापालिकेला आरोग्य वैद्यकिय अधिकारी म्हणुन डॉ. विजय डेकाटे यांची नियुक्ती केली होती. मात्र त्यांची कारर्किद चांगलीच गाजल्यानंतर अखेरीस त्यांच्याकडुन या पदाचा कार्यभार काढत त्यांना वैद्यकिय अधिक्षक पद देण्यात आले होते.

नंतर शासनाकडुन त्यांची पुणे येथे बदली करण्यात आली होती. डॉ. डेकाटे यांची बदली झाल्यानंतर शासनाने त्यांच्या जागी दुसरा आरोग्य वैद्यकिय अधिकारी दिला नाही. परिणामी महापालिकेतील वैद्यकिय अधिकार्‍यांकडे आरोग्य वैद्यकिय अधिकारी पदाची जबाबदारी प्रभारी म्हणुन देण्यात आली. नंतर तात्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आरोग्य वैद्यकिय विभागाचे सार्वजनिक आरोग्य व घन कचरा व्यवस्थापक अशी दोन विभाग केल्यानंतर या दोन्ही विभागाची जबाबदारी हा वैद्यकिय अधिकारी, जीवशास्त्रज्ञ यांनीच सांभाळली.

अगदी काही महिन्यापुर्वी डॉ. रावते यांच्याकडे आरोग्य वैद्यकिय अधिकारी पदाच जबाबदारी देण्यात आल्यानंतर त्यांनी पद सांभाळण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती.

त्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर चांगले काम केले. मात्र शहरात वाढत असलेला करोना संसर्गात याठिकाणी आरोग्य विभागाकडुन अधिकारी देण्यासंदर्भात शासनाचा निर्णय झाला. त्यानुसार आता त्र्यंबके यांच्या जागी अहमदनगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोंजे यांची नियुक्त करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com