डॉ. हुसेन रुग्णालयाला मिळणार सामाजिक दायित्व निधी

नवजात बालकांसाठी साकारणार विशेष कक्ष
डॉ. हुसेन रुग्णालयाला मिळणार सामाजिक दायित्व निधी
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या डॉ.झाकिर हुसेन रूग्णालयात सामाजिक दायित्व निधीतून नाशिकरोड करन्सी नोट प्रेस यांच्याकडुन 60 लाख 60 हजार रुपये खर्च करुन नवजात बालकांची काळजी घेण्यासाठी स्पेशल न्युबॉर्न केअर युनिट (एस.एन.सी.यु.) उभारण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेतील भाजपा गटनेता जगदिश पाटीत यांनी नुकताच महासभेला प्रस्ताव सादर केला आहे.

सामाजिक दायित्व निधी (सी.एस.आर.) मार्फत डॉ. झाकिर हुसेन रूग्णालयात 15 खाटांचे नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहे. याकरिता बांधकाम विषयक कामांकरीता अंदाजीत रक्कम रूपये 24.65 लक्ष व साधनसामुग्री याकरीता अंदाजित रक्कम रूपये 35.95 लक्ष असे एकूण 60.60 लक्ष इतका निधी करन्सी नोट प्रेस यांचेकडून महापालिकेला उपलब्ध होणार आहे. यास प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी भाजपा गटनेता पाटील यांनी नगरसचिव विभागाला नुकताच प्रस्ताव सादर केला आहे.

नाशिक शहरात यापुर्वी अनेक नवजात शिशू एस. एन. सी. यु. अभावी दगावले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील नवजात शिशूंसाठी स्पेशल न्युबॉर्न केअर युनिटची अत्यंत आवश्यकता होती. करन्सी नोट प्रेस, नाशिक येथे वैद्यकिय (आरोग्य) अधिकारी, सहा.वैद्यकिय (आरोग्य) अधिकारी, वैद्यकिय अधिक्षक, जे.डी.सी.बिटको रूग्णालय, नाशिकरोड व करन्सी नोटप्रेसचे एस. पी. वर्मा व सुनिल दुपारे यांचेसोबत सी.एस.आर. प्रोजेक्ट अंतर्गत महानगरपालिकेतील रूग्णालयात काय सुविधा करता येतील याबबत सखोल चर्चा झाली.

या बैठकितील चर्चेनुसार या कार्यालयामार्फत नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकिर हूसेन रूग्णालय, कथडा येथे एस.एन.सी.यु सुरू करणेबाबत सकारात्मक असल्याने सदर सी.एस.आर मार्फत एस.एन.सी.यु. करिता प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांना देणेत आलेला होता. अंतिम चर्चे अंती नाशिक मनपा सी.एस.आर.सेल यंची मान्यता घेणेबाबत सुचित केले असता नाशिक सी.एस.आर.सेल यांचे मान्यते बाबतचे पत्र प्राप्त झालेले आहे. तसेच चर्चेअंती एस.एन.सी.यु. करिता आवश्यक निधी नोट प्रेस सी.एस.आर.मार्फत उपलब्ध करून देणार असून बांधकाम विषयक कामे व साधन सामुग्री सदर निधीतुन मनपा करणार आहे.

डॉ. झाकिर हुसेन रूग्णालयातील 3 र्‍या मजल्यावरील सद्य:स्थितीत असलेल्या बालरोग आंतररूग्ण विभाग व नवजात शिशु विभाग एकत्रितपणे साधारण 3500 स्के.फुट एवढा मोठा हॉल आहे. त्याचे अंतर्गत 2 हॉलमध्ये 1800 अधिक 1200 रूपांतर करणे. 1800 स्के.फुट जागेमध्ये एस.एन.सी.यु. स्थापन करणेबाबत आवश्यक बाबी उदा. खिडक्यांना पक्क्या काचा लाऊन बंद करणे, ऍ़ल्युमिनियम पार्टीशन करणे, ऍ़ल्युमिनीयम दरवाजे तयार करणे अशा प्रकारची कामे केली जाणार आहेत. याकरिता करन्सी नोट प्रेस यांचे मान्यता पत्र सार्वजनिक आरोग्य विभागास प्राप्त झालेले असून हा निधी मार्च 2021 अखेर खर्ची करण्याबाबत त्यांनी कळविले आहे. याकामाकरिता प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी भाजपाचे गटनेता पाटील यांनी नुकताच महासभेत प्रस्ताव सादर केलाआहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com