नाशिक रोड l Nashik road (प्रतिनिधी)

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक नुकतीच सुनील संपत कांबळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होऊन अध्यक्षपदी संजय मधुकर गायकवाड व कार्याध्यक्षपदी यासीन बाबा शेख यांची निवड करण्यात आली.

बैठकीला संजय गुलाबराव पगारे, अतुल भावसार, देविदास दिवेकर, अरुण वाघमारे, श्याम पगारे, सुनील गडवे, रंगनाथ जाधव, मुकेश गरुड, विवेक वाघमारे, अक्षय बर्वे, मोनिका अडांगळे, पूजा जाधव, मनीषा भोसले, आदी उपस्थित होते.

यावर्षी उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे पाच-पाच दिवस असे एकूण दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक सुनील संपत कांबळे यांनी दिली.