ओझर नगरपरिषद मुख्याधिकारी पदी डॉ. दिलीप मेनकर

ओझर नगरपरिषद मुख्याधिकारी पदी डॉ. दिलीप मेनकर

ओझर । Ojhar

नव्याने घोषित झालेल्या ओझर नगर परिषदेच्या प्रशासकपदी निफाडचे तहसीलदार शरद घोरपड़े यांच्यावर अतिरिक्त भार होता. तसेच दिवसेंदिवस कोविडचा वाढत असलेला प्रादुर्भाव याचा विचार करता ओझरकर नागरिक हवालदिल झाले होते.

सर्वच प्रश्न उभे होते, सर्वांची एकच मागणी होती कि ओझरला पूर्णवेळ अधिकारी असावे मात्र अशाही प्रतिकूल परिस्थितित मा.आ.अनिल कदम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर ओझरला पूर्णवेळ अभ्यासू अधिकारी डॉ दिलीप मेनकर यांच्या रूपाने मिळाला. सोमवारीच ही वार्ता ओझरकराना मिळाली. आज सकाळी शासकीय वेळेत रुजू होऊन सर्व कर्मचाऱ्यांची सभा घेऊन आढावा घेतला.

ओझर शहरात येताच दीलिप मेनकर यांचे स्वागत व सत्कार मा.आ.अनिल कदम व शिवसेनेचे पदाधिकारी यानी करुण शुभेच्छा दिल्या. यावेळी मा.उपसरपंच प्रकाश महाले, प्रशांत पगार,नितिन काळे, प्रकाश कड़ाळी, अनिल सोमासे, राहुल आहिरे, कुमार जाधव सर्कल अधिकारी प्रशांत तांबे, तलाठी उल्हास देशमुख, यासह शिवसेना, युवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी दीलिप मेनकर यानी सांगितले की ओझारच्या मलभुत प्रश्नाबरोबर्च आदर्श,सुसम्पन्न शहर निर्मितिसाठी सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com