डॉ. फाळके यांना ‘भारतभूषण’

डॉ. फाळके यांना ‘भारतभूषण’

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आपल्या विलक्षण कार्यामुळे समाजाला आणि देशाला लाभ करून देणार्‍या व इतरांपेक्षा वेगळेपणाने कार्य करणार्‍या व्यक्तींना भारतभूषण 2021 हा प्रतिष्ठेचा पुरस्कार (Bharatbhushan 2021 Award) भारत सरकारच्या नीती आयोगाने प्रमाणित करून नॅशनल अँटी हॅरासमेंट फाऊंडेशनद्वारे नुकताच भोपाळ (Bhopal) येथे देण्यात आला. त्यात नाशिकच्या डॉ. चंद्रकांत अप्पासाहेब फाळके (Dr. Chandrakant Phalke) यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला...

डॉ. चंद्रकांत फाळके हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील फिल्डवर काम करत असलेल्या हजारो सेवकांना ताणतणाव व्यवस्थापनाचे कौशल्ये शिकवतात. तणावमुक्त मानसिकतेने कार्य करून अपघात थोड्या प्रमाणात जरी टाळता आले तरी काही जीव वाचवता येतील, हा प्रामाणिक उद्देश ठेऊन सुरू केलेले त्यांचे कार्य आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरदेखील विविध क्षेत्रातील सेवक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी निरंतर सुरू आहे. आज देशपातळीवर ह्या कार्याचा गौरव होत असताना विविध क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे.

त्यांच्या कार्याची दखल अमेरिकेतील ‘भारत एफ. एम.’ या रेडिओ स्टेशनने घेऊन रुबरू या कार्यक्रमात एक तासाची मुलाखत प्रसारित केली तसेच ‘बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये देखील त्यांच्या कार्याची नोंद घेण्यात आली. डॉ. चंद्रकांत फाळके यांनी त्यांना मिळालेला भारतभूषण हा प्रतिष्ठेचा पुरस्कार महाराष्ट्रातील व बाहेरील सर्व कर्मचारी, बंधू-भगिनींना समर्पित केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com