भरजरी पैठणी, मराठमोळा फेटा बांधून डॉ. भारती पवारांचा येवलेकरांनी केला सन्मान

भरजरी पैठणी, मराठमोळा फेटा बांधून डॉ. भारती पवारांचा येवलेकरांनी केला सन्मान

येवला | प्रतिनिधी | Yeola

आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar) यांचा येवल्याची प्रसिद्ध पैठणी व मराठमोळा फेटा बांधून दिल्लीत (Delhi) सत्कार करण्यात आला....

दिंडोरीच्या लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. पवार यांची केंद्रीय मंत्रीमंडळात आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्रीपदी नियुक्ती होताच तालुक्यातील भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी पेढे वाटत व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला होता.

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत जाऊन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात येवल्यातील प्रसिद्ध फेटा व विणकारांनी हातमागावर विणलेली पैठणी, भगवत गीता देऊन सत्कार केला.

प्रथम महिला केंद्रीय मंत्रीपद खा. डॉ. पवार यांच्या रुपाने नाशिक जिल्ह्यास (Nashik District) मिळाले आहे. शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रश्न संसदेत मांडणे व तडीस नेणे, या गुणांची दखल घेत उच्चशिक्षित महिला प्रतिनिधीस मंत्रीपदाची संधी देऊन येवलेकरांचा सन्मान झाला, अशी भावना जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद शिंदे (Anand Shinde) यांनी व्यक्त केली.

डॉ. पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आनंद शिंदे, भारतीय मजदुर संघाचे श्रावण जावळे, माजी नगरसेवक संजय कुक्कर, तालुका भाजपा अध्यक्ष डॉ. नंदकिशोर शिंदे, दिनेश परदेशी, मिननाथ पवार, प्रसिद्ध फेटा कलाकार श्रीकांत खंदारे, युवराज पाटोळे, धिरज परदेशी, युवमोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चेतन धसे, संतोष काटे, भुषण भावसार, मच्छिंद्र पवार, मयुर कायस्थ, निलेश परदेशी, अण्णा पवार यांनी दिल्लीच्या कार्यालयात त्यांचा सत्कार केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com