ना. पवारांची रेल्वे अधिकार्‍यांशी चर्चा

ना. पवारांची रेल्वे अधिकार्‍यांशी चर्चा

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

कोविड (covid-19) संक्रमणामुळे अनेक दिवसांपासून रेल्वेसेवा (Railway service) मोजकीच सुरू असल्याने शेतकरी (farmes), व्यापारी (trader), विद्यार्थी (students), नोकरददार आदी प्रवाशांना रेल्वे संदर्भात अडचणी येत असल्याने

केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. भारती पवार (Union Health and Family Welfare Minister Dr. Bharti Pawar) यांनी याची दखल घेत रेल्वे प्रशासनाचे वरीष्ठ अधिकारी (Senior Officer of Railway Administration) यांचे समवेत व्हर्चुअल बैठक (Virtual meeting) घेऊन महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली.

नाशिक जिल्ह्यात (nashik district) कांदा (onion), द्राक्षे (Grapes) या मुख्य पिकांबरोबर भाजीपाल्याचे मोठे उत्पादन होते. साहजिकच या शेतमाल निर्यातीसाठी (Export) पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) यांनी किसान रेल (Kisan Rail) सुरू केली. त्याचा फायदा शेतकर्‍यांना होत आहे. परंतु किसान रेलला अधिकाधिक सुविधा मिळाव्या यासाठी ना. पवार यांनी रेल्वे अधिकार्‍यांशी चर्चा केली. जिल्ह्यात कांदा, द्राक्षे, डाळिंब, टोमॅटो, फळभाज्या, पालेभाज्या या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.

हा माल वेळेत व वातानुकूलित बोगीने बाजारपेठेत पोहचावा यासाठी किसान रेलला बोगी वाढविणे गरजेचे आहे. तसेच जे.एन.पी.टी मुंबई (mumbai) येथे माल निर्यात करण्यासाठी कंटेनर देखील रेल्वेने जर उपलब्ध करून दिले तर त्याचा मोठा फायदा शेतकर्‍यांना होईल. तसेच नाशिक (nashik) येथून सुटणार्‍या राजधानी एक्सप्रेसचा (Rajdhani Express) थांबा ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार तीन मिनिटाचा असावा.

जिल्ह्यातून फुलांची निर्यात होते. त्यासाठी मंगला एक्सप्रेससाठी (Mangala Express) रनिंग बोगी सुरू करावी. किसान रेलचा थांबा हा पश्चिम बंगालच्या गौर मालदा, बनगाव येथे त्वरित सुरू करावा. कांद्यासाठी बंदीस्त बोगी असते परंतु फळभाज्या व द्राक्षांसाठी ती वातानुकूलित असावी. याबरोबरच प्रवाशी, नोकरदार, विद्यार्थी व व्यापार्‍यांना अत्यावश्यक सेवा मिळावी याकरिता गोदावरी (godavari), कामायनी (Kamayani), काशी एक्सप्रेस (Kashi Express) सुरू करावी अशी मागणी करण्यात आली.

हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन रेल्वे अधिकार्‍यांनी दिले. याप्रसंगी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी एन.के. सिंग, अखलाक अहमद, अनिल पटके, कैलास भोसले, माणिक पाटील, जि.प. सदस्य डी.के. जगताप, कृऊबा सभापति सुवर्णा जगताप उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com