डॉ. पवार, फडणवीस यांनी घरोघरी जाऊन केली लसीकरणाबाबत जनजागृती

डॉ. पवार, फडणवीस यांनी घरोघरी जाऊन केली लसीकरणाबाबत जनजागृती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

केंद्र सरकारने (Cental Government) केलेल्या आवाहनानुसार ‘हर घर टीका, हर घर दस्तक’ कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्याचे (Nashik District) शंभर टक्के लसीकरण (Vaccination) पूर्ण करण्यासाठी आता लसीकरणापासून वंचित राहिलेल्या प्रत्येक गावातील लोकांची यादी तयार करण्यात येत आहे...

प्रत्येक गावात करोना प्रतिबंधक लसीकरणाचे (Corona Vaccine) सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar) पेगलवाडी (Pegalwadi) येथील काही घरांमध्ये जाऊन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या लसीकरणाच्या टीमने घरोघरी जाऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या लोकांना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली.

प्रत्यक्ष लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. लसीकरणाबद्दल जनजागृती करून सर्व स्तरावर लसीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. लोकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. भारती पवार व देवेंद्र फडणवीस यांनी केले.

केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार प्रीतम मुंडे यांनी गावातील घरांमध्ये जाऊन लोकांना लसीकरणाबाबत जनजागृती केली. ‘हर घर टीका, हर घर दस्तक’ प्रमाणे लोकांमध्ये जनजागृती करून जिल्ह्याचे शंभर टक्के लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com