
नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिक जिल्ह्यातील विविध विकास कामाचा आढावा नुकताच घेण्यात आला. यावेळी 'आझादी का अमृत महोत्सव' या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याचे आरोग्य कॅम्प राबविण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या....
ग्रामीण भागात आरोग्य शिबीर घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या माध्यमातून एक नोडल अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक माध्यमातून करायचा असून आरोग्य शिबिरे त्यांच्या माध्यमातून होतील. अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.
आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेस त्या संबोधित करत होत्या. यावेळी डॉ पवार म्हणाल्या की, ग्रामीण आरोग्य सुधारण्यासाठी लोकांचे स्क्रिनिंग करून हा कॅम्प कसा होईल याबाबत आढावा घेण्यात आला आहे.
नाशिकमधून 15 तालुक्यात हा आढावा होईल. . आयुष्यमान भारत योजना कार्ड धारक 4 लाख आहेत. सर्वांना कार्ड दिले जाईल. यात मेडिकल कॉलेज जिल्हा रुग्णालये तसेच बिगर शासकीय संस्था यांचा समावेश करता येईल. या मध्यातून नागरिकांना हेल्थ विषयी कामे होतील.
डाळिंब द्राक्ष बाबत शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले आहे. त्याबाबत आढावा घेतला. जेव्हा आम्ही प्रकरणे दाखल केली गेली. काही कंपन्यांनी विशिष्ट कालावधीने फसवणूक केली.
आता आम्ही ग्राम स्तरावर येणाऱ्या व्यापाऱ्याबाबत पोलीस पाटील यांना सांगितले आहे. याबाबत हेल्प लाईन करणार आहोत. शेकऱ्यांना रकमा मिळाल्या आहेत. ग्रामीण भागात पोलीस स्टेशनला तक्रार करण्याबाबत सूचना केल्या.
वन पट्टे आढावा
वनपट्टे बाबतीत केंद्र सरकारच्या मध्येमातून आपण दिशा दिली आहे. 32हजार 224 प्रकरणे मंजूर झाले असून 150 प्रकरणे प्रलंबित आहेत. यासोबतच 32 हजार सातबारा झाला. एप्रिल अखेर पूर्ण होईल. गाव पातळीवर विभागीय, जिल्हा आणि राज्य स्तरावर आपण काम केले आहे.
अटल मिशन 2.0 मोहीम
आपल्या जिल्ह्यात सुरगाणा, मनमाड, येवला व नांदगाव या ठिकाणी सर्व्हे केला आहे. ही योजना राबविण्यात येण्याबाबत केंद्राकडून मागणी करण्यात येणार आहे. जलजीवन मिशन 7 लाख घरांना आपण हर घर जल या अंतर्गत पाणी पुरविले आहे. तर 5 लाख 67 हजार घरांना कनेक्शन दिले गेले आहे.
अनाथ बालके
कोव्हीड पीएम केयर फंडमधून 55 बालकांना बालसंगोपन मदत, वारस नोंद, शिधापत्रिका अधिकाऱ्यांनी मदतीचा हात दिला आहे.
पाणी वापर
उन्हाळा सुरू होत आहे. टँकरची परीपूर्तता करून द्यावी. उन्हाळ्यात पाण्यावाचून अडचण येणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
लसीकरण होणे आवश्यक
निडल फ्री लसीकरण करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये ट्रेनिंगची आवश्यकता आहे. पुढे होईल सुरू. ज्या भागात हर घर दस्तक हा कार्यक्रम आम्ही लसीकरणसाठी राबवतो आहोत. ज्या भागात झाले नाही त्या भागात जनजागृती करण्यासाठी आपण राबवित आहोत.