डॉ. भारती पवार दिल्लीत; केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश होणार?

डॉ. भारती पवार दिल्लीत; केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश होणार?

नवी दिल्ली | New Delhi

दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या (Dindori Loksabha) खासदार डॉ. भारती पवार (MP Dr Bharati Pawar) यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. डॉ. पवार या दिल्लीत दाखल झाल्या आहेत.

डॉ. भारती पवार यांचे संभाव्य यादीत नाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काही दिवसांपूर्वी भाजप महिलांचा सन्मान करणारा पक्ष असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते. अचानक त्यांचे नाव चर्चेत आल्यामुळे नाशिककरांसह उत्तर महाराष्ट्राला मंत्रिपद मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे....

कोण आहेत डॉ भारती पवार

डॉ भारती पवार यांनी 5 जुलै 2019 मध्ये भाजपत प्रवेश केला. शरद पवारांचे निकटवर्तीय असलेल्या दिवंगत माजी मंत्री ए टी पवार यांच्या त्या स्नुषा आहेत. डॉ पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते पदाबरोबरच प्रदेश उपाध्यक्षपद भूषविलेले आहे.

त्या राष्ट्रवादीकडून दोनदा जिल्हा परिषद सदस्यही राहिल्या आहेत. डॉक्टर असल्याने एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा म्हणून पहिले जाते. डॉ पवार यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभे केले आहे.

ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क आणि काम आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवार असताना, लाखांच्या घरात मते त्यांनी मिळवली.

२०१९ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार आयात केल्याने ग्रामीण भागात भारती पवारांना मोठी सहानुभुती मिळाली. स्वत:ची यंत्रणा आणि आता सत्ताधारी भाजपची ताकद मिळाल्याने दिंडोरीत त्यांच्यासह पक्षाचीही ताकद वाढली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com