सहा हजार नवमतदारांकडून इ-मतदान कार्ड डाउनलोड

सहा हजार नवमतदारांकडून इ-मतदान कार्ड डाउनलोड

नाशिक | Nashik

जिल्हयात इ-मतदान कार्ड (E Card) प्रकल्प हाती घेतला असून यास नवमतदारांचा प्रतिसाद (Voters Response) मिळत असल्याचे चित्र आहे.

जिल्हयात १५ विधानसभा मतदारसंघातील (Assembaly Election) ६ हजार ४८० नवमतदारांनी मोबाइल व लॅपटोपद्वारे इ-मतदान कार्ड डाउनलोड (E Download) केले आहे.

दरम्यान केंद्र सरकारच्या डिजी लॉकर (DIGI Locker) व अन्य सुविधांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना त्यांची कागदपत्रे एकाच ठिकाणी जतन करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याच धर्तीवर मतदारांना इ मतदान कार्ड मिळावे म्हणून निवड्णूक आयोगाने ( Election Commission) इ-मतदान कार्ड प्रकल्प हाती घेतला आहे.

नांदगाव तालुक्यात(Nandgoan Taluka) १०७, मालेगाव मध्य १२१, मालेगाव बाह्य ८०, बागलाण ४२, कळ्वण १११, चांदवड ४७१, येवला ८५६, सिन्नर १०-, निफाड ५७६, दिंडोरी १३४७, नाशिक पूर्व ९२५, नाशिक मध्य ९७५, नाशिक पश्चिम ५९४, देवळाली १४५, इगतपूरी ५७ या संख्येने पंधरा मतदार संघामध्ये (Fifteen Election Assembly) नवमतदारांनी त्यांचे इ-मतदान काड डाउनलोड केले आहे.

इ-आधाराच्या (E Aadhar) धर्तीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) हा प्रकल्प हाती घेतला आहे. पायलट प्रकल्प म्हणून ओळखला जाणाऱ्या इ-मतदान कार्डला जिल्हयातील विविध भागातून नवमतदारांचा प्रतिसाद मिळ्त असल्याचे दिसून येत आहे.

या प्रकल्पातर्गत गेल्या वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये मतदार यादीत (Voter List) नाव नोंद विलेल्या १८ ते २० वर्षे वर्योगटातील युवकांना प्रायोगिक तत्वावर अशा प्रकारचे काड उपलब्ध करुन देण्यात आले होते. मतदारांना नॅशनल व्होटर सर्विस पोर्टलवरुन (National Voter Service Portal) हे काड र्डाउनलोड करता येते.

दरम्यान इ मतदान कार्ड डाउनलोडसाठी बीएलओ मतदारांशी (BLO Voter) संपर्क साधत आहे. मात्र सुरक्षिततेअभावी मतदार त्यांंच्या मोबाइलवर आलेला ओटीपी बीएलओना देण्यास धजावत नाही.

त्यामुळे संबंधित मतदारांनी तहसीलदार कार्यालयात (Tahsil Office) संपर्क साधत हे कार्ड प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन निवड्णूक शाखेने केले आहे. लॅपटॉप व मोबाइलवरुन हे मतदार काड डाउनलोड करता येत असल्याने ते सहज उपलब्ध होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com