डबल ट्रॉली उस वाहतूक धोकादायक; परिवाहन विभागाद्वारे कारवाईची मागणी

डबल ट्रॉली उस वाहतूक धोकादायक; परिवाहन विभागाद्वारे कारवाईची मागणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ऊस वाहतूक (Transportation of Sugarcane) करणार्‍या ट्रॅक्टर (tractor) ड्रायव्हर वाहन चालवताना बेकरकारपणे वागत असतात. त्यांमुळे सर्व सामान्यांच्या जिवितास धोका निर्माण होत आहे.

परिवहन विभागाकडून (Department of Transport) ट्रॅक्टर डबल ट्रॉली (Double trolley) ने उस वाहतूक करणे चुकीचे तसेच सर्व सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका असल्याकारणाने ट्रॅक्टर डबल ट्रॉलीचे करार रद्द करावे असे आदेश काढण्यात यावे ही विनंती मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेतर्फे (Motor Owners Workers Transport Association) करण्यात आली.

सामान्य लोकांचा जीव धोक्यात घालून या ट्रॅक्टर डबल ट्रॉली ने क्षमतेपेक्षा जास्त माल घेऊन जाण्याचा धडाका लावला आहे व या वाहतुकीचे साखर कारखाने (Sugar factory) पण समर्थन करतांना दिसतात.

निरपराध, मोटसायकल, कार चालक, ट्रक चालक व सामान्य नागरिकांना या वाहतूकीचा त्रास होतो. छोटे मोठें अपघात होतात या अपघातामुळे (accidents) निष्पाप लोकांचा अपघातात बळी जातो. ट्रॅक्टर हे शेतकरी (farmers) अवजार आहे ट्रॅक्टर ने व्यवसाय करणे चुकीचे आहे. साखर कारखानदार हे चुकीचे वाहतूक करार ट्रॅक्टर डबल ट्रॉली बरोबर करत आहे.

हा सर्व प्रकार खुप गंभीर असुन परिवहन विभागाकडून (Department of Transport) योग्य ती कायदेशीर कारवाई (legal action) करण्यात यावी अशी मागणी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सचिन जाधव, संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य विनायक वाघ, किरण भालेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विश्वास तांबे, दिलीप सिंग बेनिवाल, कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक संघटना अध्यक्ष अयुब कच्छी, संगमनेर संघटना अध्यक्ष शरीफ भाई , श्रमिक सेना पवन क्षीरसागर, अवतार सिंग बिर्दी, दीपक मंडलिक ,भास्कर चोधरी,

सचिन खैरनार, छत्रपती सेना प्रदेश अध्यक्ष राजेश पवार, संतोष भागवत , लख्खा सेठ ज्ञानेश्र्वर वरपे, चैरमन नरेश बंसल, विनोद शर्मा, जालीम सिंग,अनिल कौशिक, श्रीरामपूर दत्ता शिंदे, उल्हास शेठ,हिरामण महाजन, किरण वैद्य, वसीम भैया, बिपिन प्रवीण शर्मा, ए एन तिवारी, राजू पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com