
निफाड। प्रतिनिधी Niphad
जिल्ह्याचा कॅलिफोर्निया (California) म्हणून परिचित असलेल्या निफाड तालुक्यात (niphad taluka) अद्यापही 5 हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस तोडणी अभावी उभा असल्याने आता या ऊसाला तुरे फुटल्याने त्याचे वजनात मोठी घट होत आहे. तर ऊस वेळेवर तुटत नसल्याने शेतकर्यांचा रब्बी हंगाम (rabbi season) देखील वाया गेल्याने दुहेरी तोटा सहन करण्याची वेळ बळीराजावर आली आहे.
तालुक्याच्या गोदाकाठ भागात ऊसाचे क्षेत्र मोठे आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून तालुक्यातील सहकारी साखर कारखाने (Cooperative Sugar Factories) बंद पडल्याने तालुक्यातील शेतकर्यांंना ऊस (Cane) तोडून देण्यासाठी ऊसतोडणी कामगारांना पैसे देण्याबरोबरच पूर्ण बांडी देखील द्यावी लागत असतांनाही ऊस तोडणीसाठी कामगारांकडून वशिलेबाजीचे धोरण अवलंबविले जात आहे.
यावर्षी रासाका (RASAKA) सुरू झाल्याने शेतकर्यांना आशेचा किरण दिसू लागला होता. मात्र रासाकाची प्रतिदिन गाळप क्षमता अवघी 1500 मे. टन असल्याने व तालुक्यातील उभ्या ऊसाचे क्षेत्र बघता मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक राहण्याची शक्यता आहे. रासाका चालू झाल्याने कोळपेवाडी (kolpewadi), संगमनेर (sangamner), संजिवनी कारखाने देखील या परिसरातील ऊस तोडण्याचे टाळू लागले आहे.
यावर्षी दिवाळीनंतर ऊस तुटेल या भरवश्यावर गोदाकाठच्या शेतकर्यांनी उन्हाळ कांदा बियाणे (Summer onion seeds) टाकले होते. तर अनेक शेतकर्यांनी उन्हाळ मका, सोयाबीन आदी पिके घेण्याचे नियोजन केले होते. मात्र गत दोन महिन्यांपासून साखर कारखानदार, ऊसतोडणी मुकादम, ऊसतोडणी कामगार यांचेकडे हेलपाटे मारून देखील उपयोग होत नसल्याने आता या उभ्या ऊसाला तुरे फुटले असून त्यामुळे असा ऊस आतून पूर्णपणे पोकळ होवून वजनात मोठी घट होत आहे.
तसेच कुत्रे, कोल्हे, डुकरे यासह हिस्त्र श्वापदाकडून देखील उभ्या ऊसाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याने ऊस उत्पादक शेतकर्यांना दुहेरी तोटा सहन करावा लागत आहे. तालुक्यात अद्यापही सुमारे 5 हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस तोडणीच्या प्रतिक्षेत असून आता हा ऊस तुटणार कधी असा प्रश्न शेतकर्यांना सतावू लागला आहे.
आमदार दिलीप बनकरांच्या (MLA Dilip Bankar) प्रयत्नाने रासाका सुरू झाल्याने ही समाधानाची बाब असून आता निसाका (NISAKA) देखील चालू होणे गरजेचे आहे. साहजिकच हीच बाब हेरून आ. दिलीप बनकरांनी निसाका सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसे पाहता निसाका यापूर्वीच सुरू होणे गरजेचे होते.
मात्र इच्छाशक्तीचा अभाव अन् नकारात्मक भूमिका यामुळे निसाकावरील कर्ज वाढत गेले. मात्र आता ‘झाले गेले गंगेला मिळाले’ हा न्याय लावत ऊस उत्पादक शेतकर्यांच्या हितासाठी निसाका देखील सुरू होणे गरजेचे असल्याने त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून ऊस उत्पादक शेतकर्याला दिलासा द्यावा अशी मागणी होत आह
निसाका सुरू झाल्यास सुगीचे दिवस गेल्या सात-आठ वर्षापासून गोदाकाठ शेतकर्यांना ऊस तोडणीसाठीं विणवन्या कराव्या लागत आहे. परिणामी निसाका सुरू व्हावा यासाठी अनेकवेळा आंदोलने झाली. कधी ड्रायपोर्ट तर कधी बॉम्बे एस. मोटर्स, श्रीगोंदा शुगर या चक्रव्यूहात निसाकावर कर्ज वाढत गेले. याच काळात कारखान्यात चोर्यांचे प्रमाण वाढले. कारखान्याचे जमिनीवरील कर्ज कमी करण्यासाठी प्रयत्नच झाले नाही. मात्र आता आमदार बनकरांंनी शासन दरबारी पाठपुरावा करुन कारखान्याचे जमिनीवरील बोजा हटविला असल्याने निसाका बाबत आशेचा किरण दिसू लागला आहे. साहजिकच रासाकाप्रमाणे निसाका सुरू झाल्यास शेतकर्यांना सुगीचे दिवस येवू शकतील.
सोपान खालकर, ऊस उत्पादक शेतकरी (भेंडाळी)