बदलत्या हवामानामुळे दुबार पेरणीचे संकट

शेतीमशागतीसह बियाणे खर्चात वाढ; शेतकर्‍यापुढे आर्थिक संकट गडद
बदलत्या हवामानामुळे दुबार पेरणीचे संकट

शिरवाडे वणी । वार्ताहर | Shirwade Vani

गेल्या चार ते पाच दिवसापासून हवामानात अचानक बदल (change in weather) झाल्यामुळे खरीप हंगामातील (kharif season) पिकांवर त्याचा दुष्परिणाम जाणवू लागल्यामुळे शेतकरी (farmers) वर्ग अडचणीत सापडला आहे. साहजिकच या पिकावर केलेला खर्च आता वाया जाण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी शेतकर्‍यांना दुबार पेरणी (Double sowing) करावी लागत आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत खरीप हंगामातील पिके घेण्यासाठी शेतकरी (farmers) मे महिन्यापासूनच शेती मशागतीची तयारी करतो. परंतु तब्बल एक महिना पावसाने पाठ फिरवली. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाने (monsoon) धुवाधार बॅटिंग सुरू केली. परिणामी शेतकर्‍यांनी पेरणी केलेल्या तसेच लागवड झालल्या फळभाज्यांची नव्याने लागवड करावी लागत आहे. अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागत आहे. नैसर्गिक आपत्ती (natural disaster) कोणालाही टाळू शकत नाही याचा अनुभव निसर्गाकडून येत आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून अचानक पावसाने उघडीप दिल्यामुळे तसेच कडक ऊन तर सकाळच्या वेळेस दव पडत असल्यामुळे खरीप हंगामातील (kharif season) सुरुवातीच्या टोमॅटो, हिरवी मिरची, सिमला मिरची, कारले या लागवड झालेल्या पिकांवर गेरवा, करपा, नागअळी, लष्करी अळी या रोगांचा प्रादूर्भाव झाल्याचे भाजीपाला (vegetables) व फळभाज्या उत्पादकांकडून समजते. तसेच मल्चिंग पेपर (Mulching paper) टाकून नवीन लागवडी करत असताना उन्हामुळे पेपर तापल्यामुळे कोवळ्या रोपांचे भाजण्याचे प्रमाण वाढले आहे.

त्यामुळे रोपवाटिकांमधून आणलेल्या महागडा रोपांचा अधिक खर्च उत्पादकांच्या माथी बसत आहे. यावर्षी शेतीमध्ये फळभाज्यांच्या लागवडीसाठी लागणार्‍या साधनसामग्री म्हणजे ठिबक सिंचन (Drip irrigation), पॉलिथिन पेपर (Polythene paper), खते यांचा खर्च वाढल्यामुळे शेतकरी अक्षरशा रडकुंडीला आला आहे. परंतु शेतकरी वर्गाचा मुळ व्यवसाय शेती असल्यामुळे शेतकरी (farmers) वर्गाला ‘येरे माझ्या मागल्या’ प्रमाणे पिकांना भाव मिळतो किंवा नाही याचा विचार न करता अगोदर पिकांची उभारणी व उत्पादन घेणे आवश्यक समजून लढा द्यावा लागतो.

अति पावसामुळे सोयाबीन, मका आदी पिके कोवळ्या कोंबात पाणी जावून सडून गेल्यामुळे त्यांची दुबार पेरणी करावी लागली. सध्याच्या परिस्थितीत पावसाने उघडीप दिल्यामुळे अति उन्हामुळे कोवळे कोंब करपून जाण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे काबाडकष्ट करून पावसाच्या अंदाजानुसार पेरणी केली असतांनाही अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शेतकर्‍यांचे आर्थिक बजेट कोलमडून पडले आहे. त्यामुळे केवळ शेती आणि शेतीवरच अवलंबून असणार्‍या शेती वर्गाला नित्य नव्या संकटांना तोंड देता देता पुरेसे हैराण केले असून शेती करावी की करणे सोडून द्यावे या विवंचनेत अनेक शेतकरी सापडला आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती हा एकच पर्याय नसून उत्पादित मालाला आधारभूत भाव मिळणे गरजेचे आहे. तसेच इतर उद्योगांना जशा सवलती दिल्या जातात तशाच सवलती शासनाने शेती व्यवसायाला देवून उद्योगाचा दर्जा देणे महत्वाचे आहे. सध्याच्या परिस्थितीत भाजीपाला भावाने जरी उच्चांक गाठला असला तरी भाजीपाल्याचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे शेतीमाल परवडत नसल्याचे समजते. खरीप हंगामात पिकांसाठी केलेला मोठ्या प्रमाणावर खर्च वाया जाण्याची चिन्हे आता दिसू लागली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com