15 वर्षांवरील मुलांसाठी कोव्हॅक्सिनचा डोस

15 वर्षांवरील मुलांसाठी कोव्हॅक्सिनचा डोस

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून ( NMC )बुधवारी (दि.18)कोव्हॅक्सिन लसीचा(Covaxin vaccine ) 15 वर्षावरील वयोगटातील नागरिकांना पहिला, दुसरा व प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. नोंदणीप्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पध्दतीने करण्यात येत आहे.

शहरातील विविध भागांत ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने नांदूर युपीएचसी, नांदूर, झाकीर हुसेन हॉस्पिटल द्वारका सर्कल, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय नाशिकरोड, सातपूर विभागासाठी मायको दवाखाना जवळ स्वारबाबा नगर व एम.आय.डी.सी. सातपूर कॉलनी, पंचवटी विभागासाठी मायको हॉस्पिटल पंचवटी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, वडाळा,

सावित्रीबाई फुले हॉस्पिटल व्हिस्टा बिल्डिंग समोर म्हाडा, घरकूल योजना कलानगर नाशिक, उपनगर प्रसूतीगृह उपनगर कॉलनी, आय. एस. पी. हॉस्पिटल नेहरू नगर, प्राथमिक आरोग्य केंद्र भारत नगर, एस.जी.एम.प्राथमिक आरोग्य केंद्र, बजरंगवाडी प्राथमिक आरोग्य काठे गल्ली बनकर चौक, शिवाजी वाडी शाळा क्र.44 वडाला पाथर्डी रोड, फेस कोम हॉल, वरहीनगर रेऑन शाळेसमोर, बजरंगवाडी, सिडको प्राथमिक आरोग्य केंद्र अचानक चौक या रुग्णालयांत ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com