हाती आलेले पिक हिरावून घेऊ नका, शेतकरी संघटनेचे निवेदन

हाती आलेले पिक हिरावून घेऊ नका, शेतकरी संघटनेचे निवेदन

वावी । वार्ताहर Vavi

शेतकर्‍यांच्या हाती आलेले पिक हिरावून घेऊ नका असे आवाहन करत पांगरी (pangri) येथील शेतकरी संघटनेच्या (Farmers Association) कार्यकर्त्यांनी विज वितरणच्या येथील कार्यालयावर मोर्चा काढत सहाय्यक अभियंत्यांंना (Assistant Engineers) निवेदन (memorandum) दिले.

सध्या शेतातील पिके (Field crops) जोमात असून विहिरींना पुरेसे पाणीही आहे. मात्र, पुरेशा दाबाने विज पुरवठा (Power supply) होत नसल्याने पाण्याअभावी पिके हातातून जाण्याची भिती आहे. या काळात विज पुरवठा सुरळीत ठेवण्याऐवजी विज बिलाच्या वसुलीच्या नावाखाली शेतकर्‍यांना छळण्याचे काम होत आहे. महावितरणने वीज वसुली होत नसल्याने पांगरी परिसरातील थकबाकीदारांचे ट्रान्सफार्मर (Transformer) बंद करून विज बिलाच्या वसुलीचे काम सुरु केले आहे.

त्यामुळे परिसरातील जोमात आलेली पिके पाण्याअभावी जळून जाण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी व शेतकरी संघटनेने वीज वितरण कंपनीच्या (Power Distribution Company) कार्यालयावर मोर्चा काढला व तत्काळ वीज पुरवठा जोडणी करून द्यावी अन्यथा येथील संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा निवेदानात (memorandum) देण्यात आला आहे. सहा महिन्यापूर्वी येथील शेतकर्‍यांनी काही अंशतः वीज बिलाचा भरणा केला होता.

तरीही राहिलेले वीज बिल भरण्यासाठी विज वितरणचे सेवक शेतकर्‍यांवर दडपण आणून त्यांची अडवणूक करीत आहेत. ट्रान्सफार्मर बंद केल्यामूळे शेतकर्‍यांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा (drinking water) प्रश्न गंभीर बनला आहे. हाती आलेले शेतकर्‍यांचे पिक जळून गेले तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न यावेळी शेतकर्‍यांनी उपस्थित केला.

यावेळी सहाय्यक अभियंत्यांनी उपस्थित शेतकर्‍यांच्या व्यथा समजून घेत त्यांना राहिलेले बिल भरण्याचा आग्रह केला व मार्च महिन्याच्या आत आपला वीज बिल भरणा करावा अशी विनंती केली व उपस्थित मोर्चाचे सांत्वन करून महावितरणाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली.

यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष आत्माराम पगार, कृष्णा घुमरे, बारकू पगार, बाबासाहेब पांगारकर, रामदास पगार, गणेश डुकरे, रामदास डुकरे, बाबासाहेब कलकत्ते, आनंदा वारुळे, सोमनाथ पांगारकर, जगन्नाथ पगार, किसन वारुळे, पुंजाहरी पगार, बबन डुकरे, सुभाष डुकरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com