करिअरचा निर्णय पाल्यांवर लादू नका: आंबेकर

करिअरचा निर्णय पाल्यांवर लादू नका: आंबेकर

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

कोरोना (corona) संकटात कमी वेळ उपलब्ध असतानाही विद्यार्थ्यांनी (students) उत्तम यश संपादन केले. त्यामुळे संस्थेला त्यांचे कौतुक आहे. करिअरच्या (Career) संदर्भातील निर्णय पाल्यांवर लादू नका. पाल्याचा कल जाणून घेण्याचे आवाहन सगर विद्या प्रसारक संस्थेचे सहसेक्रेटरी राजेंद्र आंबेकर (Rajendra Ambekar, Joint Secretary, Sagar Vidya Prasarak Sanstha) यांनी पालकांना केले.

येथील महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयात (Mahatma Phule Junior College) बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ (Student Praise Ceremony) नुकताच पार पडला. यावेळी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आंबेकर बोलत होते. व्यासपिठावर सेक्रेटरी विष्णुपंत बलक यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी (students) चांगल्या संगतीत वावरणे गरजेचे आहे. वडीलधार्‍यांचा आदर करा. संस्थेचे ऋण विसरु नका असेही आंबेकर यावेळी म्हणाले.

जिद्द, संयम आणि कठोर परिश्रमाच्या (patience and hard work) जोरावर यशप्राप्ती करता येते असे प्राचार्य रामनाथ लोंढे म्हणाले. वल्लभ झगडे व ज्योती शिंदे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. किमान कौशल्य विभागाचे उपप्राचार्य के. बी. गवळी यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीचे गमक सांगितले.

यावेळी कला विभागात प्रथम अभिजीत शिंदे (77.33), द्वितीय सिध्देश सांगळे (75), तृतीय ज्योती शिंदे (74.50), वाणिज्य विभागात प्रथम वैशाली जाधव (86.67), द्वितीय श्रुती कुक्कर (81.83), तृतीय अपेक्षा सोनवणे (78.50), विज्ञान विभागात प्रथम प्रणाली गोळेसर (73.83), द्वितीय समर्थ कासार(72.33), तृतीय तेजल पांगारकर (71), तर किमान कौशल्य विभागात भोले कोशवाह (68.33), यश लोंढे (66.67),

सौरभ कुर्‍हाडे (69.77) या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाऊसाहेब सांगळे, किरण गवळी, हरिभाऊ गोळेसर, माणिक कासार, जीवन पांगारकर, विश्वास खताळे, राजेंद्र पाचोरे, अशोक जाधव यांच्यासह पालक उपस्थित होते. सूत्रसंचलन अमोल आंबेकर यांनी केले. आभार प्रदर्शन एकनाथ माळी यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com