हुंडा नको मामा फक्त रस्ता तेवढा चांगला करून द्या!

हुंडा नको मामा फक्त रस्ता तेवढा चांगला करून द्या!

बोलठाण । वार्ताहर Bolthan

नांंदगाव तालुक्यातील ( Nandgaon Taluka )बोलठाण ( Bolthan )येथील एका विवाह सोहळ्यात ( wedding ceremony ) रुसलेल्या नवरदेवाने सासर्‍याकडे चक्क रस्त्याची मागणी करून सर्वाची धांदल उडवली. लग्न कार्यामध्ये नवरदेव रुसणे, रुसलेल्या नवरदेवाचा हट्ट सासर्‍यानेे पुरवणे ,ही बाब सर्व परिचित आहे. सोन्याची वस्तू किंवा गाडी यासारख्या मागण्या नवरदेवाकडून होतात व सासरच्या मंडळीकडून त्या पूर्णही केल्या जातात .मात्र नवरदेवाकडून रस्त्याच्या आगळ्यावेगळ्या मागणीमुळे ( Demand for Road )सर्वांचीच पंचायत झाली.

याबाबत सविस्तर असे की बोलठाण येथील शेतकरी सतीश रिंढे यांची कन्या ऋतुजा हिचा विवाहसोहळा गंंगापूर तालुक्यातील गोपाळवाडी येथील जयेश यांच्या बरोबर 17 एप्रिल रोजी झाला. नवरदेव व त्यांच्या बरोबर येणार्‍या वर्‍हाडी मंडळीला बोलठाण येथे पोहोचण्यासाठी मनेगाव फाटा ते धरण हा 3 किमी रस्ताने प्रवासासाठी 1 तास लागला, त्यामुळे झालेल्या मानसिक त्रासामुळे सर्वच मेटाकुटीला आले होते.

विवाह प्रसंगांमध्ये पायघड्या टाकण्यात आल्यानंंतर तेथेच नवरदेव रुसून बसला.त्याचा रुसवा दूर करण्यासाठी सासू सासरे यांनी मनधरणी करण्यास सुरूवात केली. काय चुकले किवा काय पाहिजे याची विचारणा करण्यात आली. मात्र या नवरदेवाने मला काही नको आपण फक्त मनेगाव फाटा रस्ता करा अशी मागणी केली. सर्वांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातला.

ही मागणी सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. नाशिक व औरंगाबाद जिल्हा जोडणारा या मुख्य रस्त्यावरून प्रवास करतांना मरणासन्न यातना खुप आहेत. सार्वजनिक बांधकाम , जि. प., लोकप्रतिनिधींनी याकडे दूर्लक्ष केलेले असल्याने रस्त्याची वाट लागलेली आहे.ही सामाजिक समस्या झाल्याने अनेक विवाहांना त्याची झळ बसली आहे. त्याचा प्रत्यय आजही आल्याने शेवटी वधू पित्याने नवरदेवास आश्वासन दिले की, आपण या मार्गाच्या दुरूस्तीसाठी आमदार,खासदार, स्थानिक स्वराज्य संंस्थेकडे पाठपुरावा करू. तेव्हा कुठे नवरदेव बोहल्यावर चढण्यास तयार झाला. त्यावेळी वर्‍हाडींचा जीव भांड्यात पडला.

औरंगाबाद व नाशिक जिल्हा सीमेवर असलेल्या या रस्त्याचे जवळपास 20 वर्षापासून कोणतेही काम झालेले नाही या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी आमदार खासदार यांच्याकडे अनेकदा प्रयत्न केलेले आहे, पाठपुरावा केला आहे आंदोलन केले आहे तरीही अद्यापपर्यंत हा रस्ता मार्गी लागत नाही.

-प्रल्हाद रिंढे, ग्रामस्थ

Related Stories

No stories found.