पोषण आहारापासून बालकांना वंचित ठेवू नका: सभापती आहेर

पोषण आहारापासून बालकांना वंचित ठेवू नका: सभापती आहेर

न्यायडोंगरी । वार्ताहर | Nyadongri

अंगणवाडीतील (Anganwadi) बालकांना व कुपोषित बालकांना (Malnourished children) पोषण आहार (Nutrition diet) मिळणे हा त्यांचा हक्क असल्याने त्यांना आहारापासून वंचित ठेवू नका.

पोषण आहार वाटपामध्ये कोणतीही कसूर चालणार नाही. आहार वाटपात कुणी दोषी आढळल्यास कडक कारवाईस (Action) सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हा परिषद (zilha parishad) महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर (Women and Child Welfare Committee Chairperson Ashwini Aher) यांनी दिला आहे.

नांदगाव तालुक्यातील (Nandgaon taluka) अंगणवाडी सेविका (Anganwadi worker), मुख्य सेविका तसेच पर्यवेक्षिका यांची नांदगाव येथे कामकाजासंदर्भात आढावा नांदगाव (Nandgaon) येथे सभापती अश्विनी आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थित अंगणवाडी सेविकांशी संवाद साधतांना सभापती आहेर बोलत होत्या. बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी एक मुठ पोषण उपक्रम संपुर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविला जात आहे.

तालुक्यात कुणीही बालक कुपोषित राहू नये याची सर्वस्वी जबाबदारी पोषण आहाराचे वाटप करणार्‍या अंगणवाडी सेविकांवर आहे. पोषण आहार मिळणे हे अंगणवाडीसह कुपोषित बालकांचा हक्कच आहे. त्यामुळे ते पोषण आहारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. आहाराचे वाटप करतांना कोणतीही कसूर चालणार नाही. आहार वाटपात कुणी दोषी आढळल्यास मुलाहिजा न ठेवता कडक कारवाई केली जाईल, असा इशारा सभापती आहेर यांनी पुढे बोलतांना दिला.

या बैठकीत अंगणवाडीतील बालकांना पोषण आहाराचे वाटप नियमित होते किंवा नाही तसेच कुपोेषण (Malnutrition) कमी करण्यासाठी एक मुठ पोषण उपक्रम कशा पध्दतीने राबविला जात आहे व या उपक्रमासाठी ग्रामपंचायतीतर्फे निधी उपलब्ध करून दिला जातो कां? याची माहिती आहेर यांनी अंगणवाडी सेविकांकडून समक्ष जाणून घेतली.

बैठकीत पोषण आहार वाटपासह बाल मृत्यू, माता मृत्यू, दुर्धर आजाराचे बालक, लसीकरण, बेटी बचाव बेटी पढाव व माझी कन्या भाग्यश्री आदी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. नांदगाव तालुक्यात मंजूर झालेल्या नवीन अंगणवाडी इमारती पुर्ण, अपुर्ण तसेच इमारत नसलेल्या अंगणवाडी केंद्राची माहिती घेण्याबरोबरच अंगणवाडी मदतनीस म्हणून अंगणवाडी सेविका थेट भरती प्रस्ताव,

अंगणवाडी सेविका भरती व पंचायत समिती सेस (Panchayat Samiti Cess) अंतर्गत महिला व बालकल्याण राखीव निधीमधून (Women and Child Welfare Reserve Fund) केलेला खर्च तसेच प्राप्त झालेल्या निधी, ग्रामपंचायत सेस अंतर्गत 10 टक्के महिला व बालकल्याण राखीव निधीतून केलेला खर्च तसेच गत चार वर्षात प्राप्त झालेल्या निधीचा आढावा अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका तसेच सेविका यांच्याकडून घेत पर्यवेक्षिका यांनी अंगणवाडी केंद्रांना नियमित भेटी देण्याबाबत सभापती आहेर यांनी यावेळी निर्देश दिले.

या बैठकीत अंगणवाडी सेविकांतर्फे मांडण्यात आलेल्या विविध समस्यांचे लवकरात लवकर निवारण होण्याच्या दृष्टीकोनातून लक्ष घालू असे आश्वासन सभापती आहेर यांनी शेवटी बोलतांना दिले. या आढावा बैठकीस तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी नरेश अहिरराव यांच्यासह मुख्यसेविका, पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.