डोंगर्‍यादेव उत्सवास प्रारंभ

आदिवासींकडून खेडोपाडी परंपरा कायम
डोंगर्‍यादेव उत्सवास प्रारंभ

मोहबारी । वार्ताहर Mohbari

कळवण तालुक्यातील (kalwan taluka) पश्चिम भागासह पुनद खोर्‍यातील लखाणी, पिंपळे खुर्द, पाडगण, टाकबारी, सुळे, गोळाखाल यासह विविध खेड्या पाड्यावर तालुक्यातील ग्रामीण भागातील परिसरात आदिवासी बांधवांचे (Tribal society) कुलदैवत असलेले डोंगर्‍यादेव (Dongaryadev) उत्सवास (festival) सुरूवात झाली आहे.

आदिवासी भागात (Tribal area) दिवाळीनंतर (diwali) मार्गशीर्ष महिन्यात साधारणता नोव्हेंबर (novhember) आणि डिसेंबर (disember) या थंडीच्या (cold) दिवसात चंद्र दर्शनानंतर गावात सुख शांती लाभावी, निसर्गाचा कोप होऊ नये, शेतातील पीक चांगले यावे, घर संसाराची भरभराटी व्हावी तसेच निसर्गदेवता (Goddess of nature) डोंगर्‍या देवाला बोललेले नवसपूर्तीसाठी डोंगरे देवाची पूजा मांडली जाते.

पूजा मांडण्यासाठी गावातील हनुमान मंदिराजवळ किंवा मोकळ्या जागेत पाच माऊलींच्या हाताने देव दांडा उभा केला जातो. या जागेवर मुळासकट उपटून आणलेले झेंडूचे व तुळशीचे रोपटे लावतात. त्या देव दांड्याजवळ मोठा दगडी दिवा, मोरच्या पिसांचा गुच्छ, अंडा, लिंबू, काकडी, नागलीचे दाणे, उडदाचे दाणे, तांदूळ असे धांन्याचे पुंज पाडून थोंब रोवला जातो. थोंबच्या आजूबाजूने फेर धरून मावल्या नाचतात. मुधानी माऊलीच्या मंत्र उच्चाराने, भोपा माऊली, थाळकर कतकरी, पावरकर तसेच गावकरी मंडळी यांच्यासमवेत डोंगर्यादेव उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरी केला जातो.

साधारणता दहा ते पंधरा दिवस चालणार्‍या या उत्सवात आदिवासी बांधव आपल्या आदिवासी बांधवांचे दैवत म्हणजे डोंगर्‍या देवाचे गाणे खेडोपाड्यांमध्ये तालासुरात गाजत वाजत असल्याने गांवामध्ये आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या गावातील लोकांना पाहूणे म्हणून निमंत्रित केले जाते. डोंगर्‍या देव उत्सवात आदिवासी बांधव गावात जाऊन डोंगर्‍या देवाचे गाणे गात एका तालासुरात नाचतात गाण्याची ओळ बदलली की नाचण्याचा सुद्धा ताल बदलत असतो.

यामध्ये गावातील नागरिक सूप मध्ये अनेक धान्य पैकी पाच प्रकाराचे धान्य म्हणजे (शेज) व त्यामध्ये पिठासह देवाला नैवद्य म्हणून दान केले जाते. यात आदिवासी बांधव (Tribal society) दिवसभर उपवास करतात उपवासात भुईमुगाच्या शेंगा, राजगीरयेचे लाया, मकईच्या फुल्या असे अल्प आहार खात असतात. त्यानंतर सायंकाळी गाव खळीवर आल्यानंतर गावातील महिला मंडळी तरुणी दिव्याचे ताट करून देवाला नमस्कार करतात. त्यामध्ये गव्हाच्या पिठापासून पाच किंवा सात अशा आरत्या तयार करून देवाला ओवाळले जाते. रात्री जेवणात बिना तेलाची उडदाची डाळ व बाजरी किंवा नागलीच्या भाकरी मिरचीचा ठेचा असे सायंकाळी उपवास सोडून खाल्ले जाते.

दररोज रात्री कतकरी हे कासाच्या थाळीमध्ये सूर लावून कथा म्हणून रात्रभर जागरण केले जाते. त्यानंतर पौर्णिमेची सुरुवात झाल्यावर डोंगराच्या कडेकपारीत देवाची पूजा मांडून निसर्ग देवतेला आवाहन करून निसर्गाने आम्हाला साथ द्यावी, या जीवसृष्टीतील चिडी मुंगी, पशुपक्षी व मानवाचे कल्याण व्हावे असे विनवणी करून शेवर्यामाऊली पुजारी प्रार्थना करीत तांदळाची पुंजा टाकून नारळाने ठोकून देवाला दर्शन देण्यासाठी एक प्रकारे साद साकडे घालीत असतात. त्यानंतर सकाळी सर्व मावल्या घरी येतात. त्यांच्या स्वागतासाठी गावातील ज्येष्ठ मंडळी सह महिला लहान-थोर बालक वाट पाहत असतात. मावल्या घरी आल्यावर देवाला कोंबडा बोकडाचा मान दिला जातो. संध्याकाळी गाव जेवणाचा कार्यक्रम भंडारा केला जातो व उत्सवाची सांगता मोठ्या आनंदाने केली जाते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com