संत निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्टला देणगी

संत निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्टला देणगी

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी । Trimbakeshwar

येथील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टकडून (Trimbakeshwar Temple Devasthan Trust) संत निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्टला (Sant Nivruttinath Temple Trust) अकरा ११ लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिर जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष व श्रीकृष्ण जन्मभुमी न्यासाचे विश्वस्त स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या उपस्थितीत ही देणगी देण्यात आली.

संत निवृत्तीनाथ मंदिर जीर्णोद्धार व विकासकामे यासाठी ही देणगी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष न्या .विकास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार देण्यात आली.

तर संत निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने भाऊसाहेब गंभीरे यांनी ही देणगी स्वीकारली. यावेळी संत निवृत्तीनाथ मंदिर संस्थानचे धर्मदाय आयुक्त रामलीप्ते, देवस्थानचे विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल, पंकज भुतडा, तृप्ती धारणे हे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com