जळगाव सोसायटीत सेनेचे वर्चस्व

जळगाव सोसायटीत सेनेचे वर्चस्व

पिंपळगाव । वार्ताहर | Pimpalgaon

मालेगाव तालुक्यातील (malegaon taluka) जळगाव (jalgaon) गा. विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या (Executive Cooperative Service Society) नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत (election) शिवसेनाप्रणित (shiv sena) ग्रामविकास पॅनलने सर्व 13 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून विरोधी पॅनलला दारूण पराभव पत्करावा लागला आहे.

जळगाव गा. सोसायटीच्या 13 जागांसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनाप्रणित ग्रामविकास पॅनल व कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलमध्ये अटीतटीचा सामना झाला. या निवडणुकीत कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांचे समर्थक रमेश रतन अहिरे, राजू गेंद, पांडुरंग संसारे, लक्ष्मण गेंद, हिरालाल गेंद, खुशाल पवार, आत्माराम अहिरे, जितेंद्र अहिरे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनलने 13 पैकी 13 जागांवर घवघवीत यश मिळविले.

या निवडणुकीत (election) अशोक गंगाधर अहिरे, संतोष त्र्यंबक अहिरे, सिताराम काशीनाथ गेंद, सुरेश धोंडू गेंद, परशराम रतन पवार, साहेबराव नारायण सोनवणे, चिंतामण सोनू वाघ, बालचंद पुंजाराम शिल्लक, कांतीलाल भावराव संसारे, बापू लक्ष्मण पवार, मखमलबाई सुपडू संसारे, पुंजाबाई पोपट गेंद, बबन रामा शिल्लक आदी संचालक मताधिक्याने निवडून आले. निकाल जाहीर होताच समर्थक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. सर्व विजयी उमेदवारांचा कृषिमंत्री भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना पदाधिकार्‍यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

Related Stories

No stories found.